Anant- Radhika Wedding Viral Video Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : "कन्यादान म्हणजे दोन परिवारांचं मिलन !" नीता यांनी सुंदर शब्दांमध्ये समजावला कन्यादानाचा अर्थ

Nita Ambani Viral Video : अनंत आणि राधिका यांच्या लग्नावेळी नीता यांनी कन्यादानाचा अर्थ सांगितला.

सकाळ डिजिटल टीम

Nita Ambani : अनंत आणि राधिका अंबानीचा पार पडलेला शाही लग्नसोहळ्याची चर्चा अजूनही सुरु आहे. अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेल्या या लग्नसोहळ्याचे व्हिडीओ अजूनही गाजत आहेत. नुकतंच या लग्नसोहळ्यात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात नीता अंबानी यांनी लग्नात आलेल्या परदेशी पाहुण्यांना कन्यादानाचा अर्थ समजावून सांगितला.

नीता यांनी सांगितलं कन्यादानाचं महत्त्व

सोशल मीडियावर नीता यांचा लग्नसोहळ्यात एक व्हिडीओ गाजतोय. नीता यांनी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना हिंदू लग्नातील विधींचा अर्थ समजावला. त्या म्हणाल्या,"माझं सगळं कुटूंब, मित्रपरिवार आणि देश-परदेशातून या लग्नासाठी उपस्थित असलेले आमचे खास पाहुणे यांना जय श्रीकृष्ण, नमस्कार आणि या पवित्र सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या क्षणी मला आनंदाने, कृतज्ञतेने, भावनांनी खूप भरून आलंय. आज माझ्या लाडक्या अनंत आणि राधिकाचं लग्न आहे. ते एका कायमस्वरुपाच्या बंधनात अडकणार आहेत. हिंदू परंपरेमध्ये लग्न हे फक्त एका जन्माचं नाही तर सात जन्माचं वचन असतं. सात जन्मांचा साथ. आमचा विश्वास आहे कि प्रत्येक जन्मांमध्ये या दोन्ही आत्म्यांचं पुन्हा मिलन होणार आहे. त्यामुळे कन्यादान हा विधी केला जातो. एक मुलगी, एका मुलीची आई आणि एक सासू म्हणून मला वाटत कि मुलगी देणे हे या परंपरेचं सार नाहीये. मुली या सुपूर्द केल्या जाणाऱ्या वस्तू नसून आयुष्यभराचे आशीर्वाद आहेत . कन्यादान हे केवळ कर्मकांडाच्या पलीकडे आहे. एका परिवाराला मुलगी मिळते तर एका परिवाराला मुलगा मिळतो . यातून दोन परिवाराचं मिलन होतं" असं त्या यावेळी म्हणाल्या.

सोशल मीडियावर नीता यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलेलं या परंपरेचं महत्त्व अनेकांना पटलं. बऱ्याच जणांनी कमेंट करत नीता यांच्या म्हणण्याला सहमती दर्शवली.

अनंत आणि राधिका आज जामनगरला रवाना झाले असून त्यांचं तिथे भव्य स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची गुप्त बैठक कॅमेऱ्यात; पहिला फोटो होताच राजकीय वर्तुळात खळबळ, मास्टरमाईंडही समोर

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

MSEB Share Market : महावितरण शेअर मार्केटमध्ये येणार, खासगीकरणाकडे वाटचाल; राज्य सरकारचा प्रस्ताव, आयपीओ ओपन करण्यावरून नवा वाद

IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

BEST Strike : मुंबईकरांचे हाल... बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मेट्रो, रेल्वेत गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT