Ramayana esakal
Premier

Ramayana: 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक होताच दिग्दर्शकाचा मोठा निर्णय; चित्रपटाच्या टीमला आता पाळावे लागतील 'हे' नियम

Ramayana: नितेश तिवारी यांनी आता चित्रपटाच्या टीमसाठी काही नियम बनवले आहेत. या नियमांचे पालन चित्रपटाच्या टीमला करावे लागणार आहे.

priyanka kulkarni

Ramayana: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'रामायण' (Ramayana) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आता चित्रपटाचे नितेश तिवारी खूप चिंतेत आहेत. नितेश तिवारी यांनी आता चित्रपटाच्या टीमसाठी काही नियम बनवले आहेत. या नियमांचे पालन चित्रपटाच्या टीमला करावे लागणार आहे.

'रामायण'च्या सेटवर 'नो फोन पॉलिसी'

'इंडिया टुडे' च्या रिपोर्टनुसार, 'रामायण' या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक झाल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सेटवर नो फोन पॉलिसीचं पालन करण्यास चित्रपटाच्या टीमला सांगितलं आहे. शूटिंग सुरू झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी आणि क्रूनं सेटवरून बाहेर पडावे, असा नियम देखील नितेश तिवारी यांनी चित्रपटाच्या टीमसाठी बनवला आहे. रिपोर्टनुसार, फक्त आवश्यक कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर थांबू शकणार आहेत.

'रामायण'च्या सेटवरील लीक झालेल्या फोटोमध्ये दिसले 'हे' कलाकार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'रामायण' या चित्रपटाच्या सेटवरील एका फोटोमध्ये अरुण गोविल हे दशरथ राजाच्या भूमिकेत दिसले तर अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसली. फोटोमध्ये अभिनेत्री शीबा चड्ढा या देखील दिसल्या.

'रामायण' या चित्रपटात रणबीर हा रामाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी ही या चित्रपटात देवी सीतेची भूमिका साकारणार आहे तर या चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

रावणाच्या भूमिकेत दिसणार यश

'रामायण' या चित्रपटात अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटा शूपर्णखाची भूमिका रकुल प्रीत सिंग साकारणार,म्हटलं जात आहे.

रामायणावर आधारित असणारा आदिपुरुष हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटावर अनेकांनी टीका केली. आता नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT