Noor Malabika sakal
Premier

Noor Malabika: अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी कलाकारांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; केली चौकशीची मागणी

पोलिसांनी नूर मलाबिका दासचा मृतदेह तिच्या लोखंडवालामधील फ्लॅटमधून 6 जून रोजी ताब्यात घेतला.

priyanka kulkarni

Noor Malabika: अभिनेत्री नूर मलाबिकादासचा (Noor Malabika) काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला. पोलिसांनी नूर मलाबिका दासचा मृतदेह तिच्या लोखंडवालामधील फ्लॅटमधून 6 जून रोजी ताब्यात घेतला. रिपोर्टनुसार, पोलिसांनी नूरचा सडलेला मृतदेह ताब्यात घेतला. आता नूरच्या मृत्यू प्रकरणाबाबत ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनेत्री नूर मालाबिका दासच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं याबाबत ट्वीट देखील केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनेत्री नूर मलाबिका दासच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे."

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो देखील ट्विटरवर शेअर केला आहे. या पत्रामध्ये लिहिलेलं दिसत आहे, “नूरचा अकाली मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आत्महत्यांच्या दुःखद ट्रेंडची आठवण करून देणारा आहे. बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या दुःखद घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे यामागच्या मूळ कारणांचा सखोल तपास करणं गरजेचं आहे.”

नूर मलाबिकाच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी नूरचा सडलेला मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; IT क्षेत्रावर दबाव पण Bank of Maharashtra ची भरारी; कारण काय?

Pachpadra Refinery Fire : राजस्थानात रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन

Strait of Hormuz: 'होर्मुज'मध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; नौदलाची नवीन अ‍ॅडव्हायजरी, जोपर्यंत...

Latest Marathi News Live Update : सोलापूर महापालिकेतील विशेष सभेत पुन्हा पाहायला मिळाला गदारोळ

Pune Crime: आज गेम वाजवायचा, पुण्यातील हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह गुंडांची दहशत; चौघांवर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT