Bigg Boss marathi season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये सहभागी होणार 'ही' सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ? ओंकार भोजनेला डेट करत असल्याची होती चर्चा

Bigg Boss Marathi Season 5 contestant update : बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये एक युट्युबवरील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कोण आहे ही व्यक्ती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Colors Marathi : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी सीजन ५'चं बिगुल वाजलं आहे. या वर्षी अभिनेता रितेश देशमुख या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. २८ जुलैपासून सुरु होणाऱ्या या शोसाठी प्रेक्षक उत्सुक असून या सीजनला कोण सेलिब्रिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सध्या कलाकारांच्या बरोबरीनेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं प्रस्थही वाढलंय. यांचाही चाहतावर्ग मोठा असून अनेक कार्यक्रमांमध्येही हे सहभागी झाल्याचं दिसून येतात. अशीच एक प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'बिग बॉस मराठी सीजन ५' मध्ये सहभागी होणार असल्याची बातमी समोर येतेय.

बिग बॉस मराठी_५ असं नाव असलेल्या एका इंस्टाग्राम पेजने शेअर केलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार सोशल मीडियावर कोकणहार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार आहे. २८ जुलैला अंकिता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. पण याबाबतची निश्चित माहिती शो सुरु झाल्यावरच समजेल.

कोकणहार्टेड गर्ल नावाने फेमस असलेली अंकिता प्रभू वालावलकर ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत असते. अनेक राजकीय घटनांवर तिने भाष्य केलं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ती सपोर्ट करते. मध्यंतरी ती ओंकार भोजनेला डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण तसं काहीही नसल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं. कोकणात तिच्या वडिलांच्या मालकीचं रिसॉर्ट असून या रिसॉर्टवर अनेक सेलिब्रिटीजही राहायला जातात.

मध्यंतरी तिने तिच्या एका जुन्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. यामुळेही ती चर्चेत आली होती. आई-बाबांना सोडून ती त्या काळात त्या मुलाबरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याचं भाष्य तिने केलं होतं.

अंकिता खरंच बिग बॉस मराठीच्या घरात जाणार का ? स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेली ती बिग बॉस मराठीच्या घरात कसा खेळ खेळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. २८ जुलैला रात्री ९:३० वाजता बिग बॉस मराठी सीजन ५ चा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडणार आहे. सीजन ५ मध्ये आणखी कोण स्पर्धक आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT