OTT Releases This Week  esakal
Premier

OTT Releases This Week: यंदाचा वीकेंड असणार खास; घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Releases This Week: यंदाचा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

priyanka kulkarni

OTT Releases This Week: वीकेंडला विविध चित्रपट आणि वेब सीरिज बघायला अनेकांना आवडतात. नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) रिलीज होत असतात. यंदाचा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

'अमर सिंह चमकीला'- नेटफ्लिक्स

अभिनेता दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा 'अमर सिंग चमकीला' हा चित्रपट आज (12 एप्रिल) रिलीज झाला आहे. या चित्रपटात पंजाबी गायक अमरसिंग चमकिला यांची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

'फॉलआउट'- अॅमेझॉन प्राइम

जोनाथन नोलन आणि लिसा जॉय यांची 'फॉलआउट' ही वेब सीरिज रोल-प्लेइंग व्हिडिओ गेम फ्रँचायझीवर आधारित आहे. ही सीरिज आज (12 एप्रिल) रोजी अॅमेझॉन प्रामवर रिलीज होईल.

गामी-ZEE5

गामी हा तेलुगू चित्रपट ZEE5 वर आज (12 एप्रिल) प्रदर्शित होणार आहे. विद्याधर कागिता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हिमालयातील एक कथा दाखवण्यात आली आहे.

'प्रेमालू'- डिस्ने+हॉटस्टार

'प्रेमालू' हा मल्याळम चित्रपट रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. 3 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता 'प्रेमलू' हा चित्रपट आज (12 एप्रिल) डिस्ने+हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

'स्टोलन'-नेटफ्लिक्स

एले मार्जा ईराचा 'स्टोलन' हा चित्रपट एन-हेलेन लास्टॅडियस यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT