Pada esakal
Premier

Pada: सत्य घटनेवर आधारित प्रभावी राजकीय थरारपट; कसा आहे 'पाडा' चित्रपट?

Pada: केरळमधील पालघट शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात १९९६ मध्ये चार लोक शिरले. त्यानंतर त्यांनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला पुढचे 10 तास ओलीस ठेवले.

अक्षय शेलार shelar.a.b.mrp4765@gmail.com

Pada: एका विस्मृतीत गेलेल्या घटनेवर आधारलेले ‘पाडा’चे (2022) (Pada) कथानक आहे. केरळमधील पालघट शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात १९९६ मध्ये चार लोक शिरले. त्यानंतर त्यांनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला पुढचे 10 तास ओलीस ठेवले. तत्कालीन सरकारने आदिवासी जमीन हक्क कायद्यात सुधारणा करण्यासाठी मांडलेले विधेयक मागे घ्यावे, ही एकच त्‍यांची मागणी होती. त्यांनी केलेल्या कृतीमुळे सरकारचे लक्ष वेधले जाऊन चर्चा घडून येतील आणि तिथल्या आदिवासींना न्याय मिळेल, अशी त्यांची धारणा होती. कमल के. एम. दिग्दर्शित ‘पाडा’ या चित्रपटाची सुरुवात याच घटनेपासून सुरू होते.

राकेश (कुंचाको बोबन), अरविंदन (जोजू जॉर्ज), बालू (विनायकन) आणि कुट्टी (दिलीश पोतान) हे चौघे इथले चार कार्यकर्ते आहेत. ते स्वतःला ‘अय्यंकाली पाडा’ म्हणवतात. हत्यारं जमवणे, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पाळत ठेवणे, यापासून चित्रपट सुरू होतो. दुसऱ्या दिवशी ते जिल्हाधिकारी कार्यालयात शिरतात आणि फक्त जिल्हाधिकाऱ्याला ओलीस ठेवून इतर सर्वांना बाहेर हाकलतात. त्यानंतर चित्रपट दोन पातळ्यांवर पुढे सरकतो. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना दिसतात, तर दुसरीकडे, सरकारी यंत्रणा आणि पोलिसांच्या हालचाली दिसतात. ‘अय्यंकाली पाडा’च्या कृतीमुळे अवघ्या काही तासांमध्ये सरकारी यंत्रणा हवालदिल झालेली असते. जिल्हाधिकाऱ्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला ओलीस ठेवून सरकारला वेठीस धरल्यामुळे सरकारी यंत्रणेची नाचक्की होईल, असे सर्वांना वाटत असते. अशात वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मदतीने समोर उद्भवलेली परिस्थिती कशी सोडवता येईल, याच्या हालचाली सुरू होतात.

‘पाडा’मधील आशय-विषय आणि घटनांचे स्वरूप यामुळे हा नाट्यमय राजकीय थरारपट यथायोग्य वेगाने पुढे सरकतो. अवघ्या काही तासांमध्ये घडणारे कथानक, त्यातील तीव्रता आणि निकडीची भावना जपत समोर मांडले जाते. त्यातील राजकीय आशयदेखील बोथट नाही. चित्रपट तत्कालीन सरकार व पोलिस यंत्रणेची चिकित्सा करतो. सोबतच चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांनी मांडलेली समस्या अजूनही सुटलेली नाही, उलट अधिक प्रखर झाली आहे, असे चित्रपटाच्या शेवटाकडील भागात येते. ‘अय्यंकाली पाडा’ची घटना घडल्यानंतर केरळमध्ये सामाजिक-राजकीय पातळीवर काय घडले आणि इथल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा ज्या माणसांवर बेतलेल्या होत्या, त्यांचे आयुष्यात पुढे काय झाले, याविषयीचा संक्षिप्त भाग चित्रपटाच्या शेवटी आहे.

सव्वादोन तासांचा हा चित्रपट दोन प्रकारे यशस्वी ठरतो. एकीकडे हा चित्रपट पाहत असताना आपल्याला खिळवून ठेवतो, तर दुसरीकडे चित्रपट संपल्यानंतर त्यात मांडलेल्या मुद्द्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास प्रवृत्त करतो. हे दोन्ही परिणाम फारच महत्त्वाचे आहेत. कारण मल्याळम चित्रपटांमध्ये गेल्या काही काळात काही महत्त्वाचे चित्रपट निर्माण झालेले आहेत. त्यातून सामाजिक-राजकीय मुद्दे मांडत असताना चित्रपट माध्यमाचा केलेला वापर आणि केवळ ‘संदेश देणे’ यापलीकडे जात दृक्-श्राव्य माध्यमाचा केलेला विचार आणि कौशल्य असे सारेच पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

SCROLL FOR NEXT