Premier

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

Hania Aamir: बादशाह हा हानियाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

priyanka kulkarni

Badshah: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Amir) आणि प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. बादशाह आणि हानिया हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे बादशाह हा हानियाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अशातच आता एका मुलाखतीमध्ये हानियानं बादशाहसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

काय म्हणाली हानिया?

BBC Asian Network, च्या मुलाखतीत बादशाहबाबत एक प्रश्न हानियाला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना हानिया म्हणाली, "बादशाहनं माझ्या एका रिलवर कमेंट, त्यानंतर त्यानं मला मेसेज केला होता. बादशाह हा माझा खूप चांगला मित्र आहे. तो खूप चांगला व्यक्ती देखील आहे, त्यामुळेच तो माझा चांगला मित्र आहे."

मुलाखतीमध्ये हानियाला विचारण्यात आलं की, "तुझं सध्याचं आवडतं गाणं कोणतं आहे?" या प्रश्नाचं उत्तर हानियानं दिलं,  'God Damn'  यावर मुलाखत घेणारा म्हणाला की, "हे गाणं बादशाहचं आहे, त्याच्या आणि तुझ्या डेटिंगची चर्चा सध्या होत आहे." यावर हानिया म्हणाली, "मला कधीकधी वाटते की, माझा एकच प्रॉब्लेम आहे की, मी लग्न केलं नाही. जर मी लग्न केलं असतं तर अशा अनेक अफवांपासून मी वाचले असते."

मुलाखतीमध्ये हानियाला बादशाहच्या गाण्यांबाबत काही प्रश्न देखील विचारण्यात आले. या प्रश्नांमधील काही प्रश्नांची उत्तरं हानियानं बरोबर दिली.

काही दिवसांपूर्वी हानिया आणि बादशाह हे दुबईमध्ये एकत्र स्पॉट झाले. या दोघांनी एकमेकांचे दुबईमधील फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: एकाच महिन्यात महिलेचे तीनदा लग्न; बळजबरीमुळे कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न, पुण्यातून चालतंय लग्नाचं रॅकेट

Latest Marathi News Live Update : मुंब्र्यात एकाच दुचाकीवर सहा जणांचा स्टंट; जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Booking Rules : सरकारने घरगुती LPG बुकिंगचे नियम बदलले, आता २१ दिवसांपूर्वी बुक होणार नाही दुसरा सिलिंडर, कारण काय ?

अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

Kolhapur College Crime: इंजिनियरींगच्या ५ विद्यार्थिनींना प्राध्यापकाने केबीनमध्ये बोलवलं अन् घडलं भयानक; कोल्हापूरमध्ये प्रकार

SCROLL FOR NEXT