Rahat Fateh Ali Khan Arrested 
Premier

Rahat Fateh Ali Khan Arrested: प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक; नेमकं काय आहे कारण?

Rahat Fateh Ali Khan Arrested In Dubai : राहत फतेह अली खान यांचा माजी मॅनेजर सलमान अहमद यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

रोहित कणसे

Rahat Fateh Ali Khan Arrested: प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना पोलिसांनी दुबई विमानतळावरून अटक केली आहे. त्यांचे माजी मॅनेजर सलमान अहमद यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, राहत फतेह अली खान यांचे माजी मॅनेजर सलमान अहमद यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत त्यांना दुबई विमानतळावरून अटक करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, राहत फतेह अली खान यांना यूएई मध्ये बुर्ज दुबई पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राहत फतेह अली खान आणि त्यांच्या माजी मॅनेजरमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. सलमान अहमद यांनी राहत फतेह अली खान यांच्याविरोधात दुबई आणि दुसऱअया शहरात देखील तक्रारी दाखल केल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजंसीने राहत फतेह अली खान यांच्यावर कारवाई केली होती. राहत यांच्यावर आरोप होता की त्यांनी १२ वर्षांमध्ये लोकल आणि इंटरनॅशनल म्यूझिक कॉन्सर्टमधून तब्बल आठ अब्ज रुपये कमावले आहेत. त्यामुळे एजंसीकडून त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि टॅक्स चोरीच्या आरोपांचा तपास करण्यात येत होता.

यासोबतच राहत फतेह अली खान यांनी आपल्या एका शिष्याला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये राहत हे चप्पलने मारहाण करताना दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत 'या' प्रभागात मनसे विरुद्ध भाजपमध्ये तगडी फाईट... राज ठाकरेंचा पठ्ठ्या आघाडीवर

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात टपाली मतदानाचा कौल कुणाला? सतेज पाटलांकडून कडवी झूंज, पहिल्या टप्प्यात कोण आघाडीवर

Latur Municipal Election Results : लातूर महानगरपालिका निवडणुकीचे पहिले कल हाती, भाजपची मुसंडी, कॉंग्रेसला मोठा धक्का

इचलकरंजी महापालिकेत भाजप विरुद्ध शिव-शाहू आघाडीची थेट लढत

SCROLL FOR NEXT