Panchayat 3 
Premier

Panchayat 3: वडिलांच्या निधनानंतर हॉटेलमध्ये केलं वेटरचं काम, आता गाजवतोय ओटीटी विश्व; फुलेरा गावाच्या जावयाची काय आहे कहाणी?

Aasif Khan: आसिफला पंचायत या वेब सीरिजमुळे लोकप्रियता मिळाली. पण पंचायत वेब सीरिजच्या व्यतिरिक्त त्यानं इतर काही हिट वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

priyanka kulkarni

Panchayat 3 On OTT: 'पंचायत 3' (Panchayat 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकेतेने वाट बघत होते. आता ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. 'पंचायत 3' ही वेब सीरिज 28 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर अनेकजण या वेब सीरिजचं कौतुक करत आहेत. अशातच या वेब सीरिजमधील कलाकारांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या वेब सीरिजमधील फुलेरा गावाच्या जावयाची भूमिका साकारणारा आसिफ खान (Aasif Khan) देखील सध्या चर्चेत आहे. आसिफ हा पंचायत या वेब सीरिजमध्ये गणेश ही भूमिका साकारतो. आसिफला पंचायत या वेब सीरिजमुळे लोकप्रियता मिळाली. पण पंचायत वेब सीरिजच्या व्यतिरिक्त त्यानं इतर काही हिट वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात आसिफच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...

आसिफ हा राजस्थानमधील चित्तौडगडमधील निंबाहेरा या छोट्याशा गावातला आहे. त्याचे वडील एका सिमेंट कंपनीत काम करायचे. आसिफच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या मुलाने त्यांच्याप्रमाणेच सिमेंट कारखान्यात काम करावे, पण असं झालं नाही. 2008 मध्ये आसिफच्या वडिलांचे निधन झाले. एका मुलाखतीत आसिफनं सांगितले होते की, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती.

आसिफनं हॉटेलमध्ये वेटर म्हणून केलं काम काम

आसिफला एक भाऊ आहे, पण वडिलांच्या निधनानंतर त्याच्या भाऊ नोकरी करत नव्हता. त्यामुळे आसिफनं घराची जबाबदारी घेतली होती. आसिफ हा विविध ठिकाणी कामं करु लागला. त्यानं एका हॉटेलमध्ये वेटरचे काम केलं. एकीकडे तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तर दुसरीकडे त्याच्या भावाला नोकरी लागली. भावाला नोकरी लागताच आसिफनं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये येऊन आसिफ थिएटरमध्ये अभिनय शिकू लागला.

आसिफनं 'या' वेब सीरिजमध्ये केलं काम

मुंबईत येणे आणि अभिनेता होणे हे आसिफसाठी अजिबात सोपे नव्हते. थिएटर करण्यासोबतच तो चित्रपटांच्या ऑडिशनला देखील जायचा. पण त्याला अनेक वेळा रिजेक्ट केलं गेलं. पण नंतर आसिफला 'मिर्झापूर'मध्ये बाबरची भूमिका ऑफर करण्यात आली होती. 'मिर्झापूर' मधील आसिफच्या बाबर या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यानंतर त्यानं 'पाताल लोक', 'जामतारा', 'पंचायत' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Quetta Train Blast : पाकिस्तान हादरले ! लष्करी जवानांच्या रेल्वेवर BLA चा आत्मघातकी हल्ला, २३ ठार, ५३ गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tech Tips : रिमोटने बंद केल्यानंतरही का सुरू राहते Smart TV ची लाल लाइट? जाणून घ्या वीजबिल वाढवणारा सिक्रेट खेळ

Pimpri: ‘पीएमपी’च्या मर्यादा; खासगी वाहने सुसाट;बससंख्या अपुरी, दुपारी लोकल नाहीत अन् मेट्रोही ठरावीक; अपघातांच्या संख्येत वाढ

'मी माझे एग्ज फ्रीज केलेत...' राखी सावंत म्हणाली की, 'माझ्या आईने मला सांगितलंय की...'

SCROLL FOR NEXT