Faisal Malik SAKAL
Premier

Panchayat 3: ना निकाह ना सातफेरे, असं केलं लग्न; 'पंचायत'मधील फैजल मलिकची हटके लव्ह स्टोरी माहितीये?

Faisal Malik aka Prahlad Pandey Love Story: फैजलनं नुकत्याच एका मुलाखतीत कुमुद आणि त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Faisal Malik aka Prahlad Pandey Love Story: पंचायत 3 (Panchayat 3) या वेब सीरिजची सध्या चर्चा होत आहे. पंचायत या वेब सीरिजचा तिसरा सीझन 28 मे रोजी रिलीज झाला. पंचायत या वेब सीरिजच्या दोन सीझन प्रमाणेच तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहे. अशातच पंचायत-3 या वेब सीरिजमुळे अभिनेता फैजल मलिक (Faisal Malik) हा चर्चेत आला आहे. फैजलनं पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये प्रल्हाद पांडे ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं अनेकजण सध्या कौतुक करत आहेत. फैजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

पंचयात-3 या सीरिजमध्ये प्रल्हादची भूमिका साकारणारा फैजल हा विविध मुलाखतींमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असतो. फैजलनं नुकत्याच एका मुलाखतीत कुमुद आणि त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे. कुमुद फैजलची पत्नी आहे. कुमुद आणि फैजलच्या लग्नाला जवळपास 12 वर्ष झाली आहे. मुलाखतीत फैजलनं त्याच्या आणि कुमुदच्या हटके लग्नस्टोरीबद्दल सांगितलं.

NDTV ला दिलेल्या मुलाखतीत फैजल म्हणाला, "मी आणि कुमुदनं ना निकाह केला ना सातफेरे घेतले, आम्ही कोर्ट मॅरेज केलं आहे. कारण आमच्या दोघांचा धर्म वेगळा आहे. लग्नाच्या वेळी मा‍झ्या आईनं कुमुदला सांगितलं की, हा वेडा आहे. ज्याच्यासोबत लग्न करुन नको."

मुलाखतीमध्ये फैजलची पत्नी कुमुद म्हणाली, "आम्हाला आमच्या धर्मामुळे कधीही काही अडचण आली नाही. आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो. आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला आमच्या धर्मांबाबत कळालं. लग्नाआधी तो मला कुमुद म्हणायचा आणि मी त्याला फैजल आम्ही कधी एकमेकांना पूर्ण नावानं हाक मारली नाही, त्यामुळे धर्माबाबत आम्हाला माहित नव्हतं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनिषा हवालदारने शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट आउट; NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा!

Video Viral: साऱ्यांनी मिळून एकाला धुतला! पेट्रोल पंपावरचा राडा व्हायरल; पेट्रोलच्या रिकाम्या कॅनने डोकं शेकून काढलं

Bread Price Hike: ग्राहकांच्या खिशाला कात्री! बेकरी पदार्थांच्या किमतींत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; काय आहेत दरवाढीची कारणे?

Latest Marathi News Live Update : नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Electric Bikes : 'या' टू-व्हीलर गाडीवर येईल पूर्ण फॅमिलीचं सामान; 140KM रेंजसह लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक बाईक, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT