Panchayat 3  Esakal
Premier

Panchayat 3 : पंचायत ३ मधील 'या' अभिनेत्याने केलंय सैफ-करिनाच्या लग्नात किचन हेल्पचं काम

Panchayat 3 actor previous work : 'पंचायत ३' वेब सिरीजमधील एका अभिनेत्याच्या कामाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. जाणून घेऊया या अभिनेत्याविषयीचा खास किस्सा.

सकाळ डिजिटल टीम

Panchayat 3 : अॅमेझॉन प्राईमवरील सध्या 'पंचायत ३' ही वेब सिरीज सध्या खूप चर्चेत आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचं मन जिंकलंय. यावेळी पंचायत ३ सीरिजमध्ये चांगलंच आंदोलन रंगल्याच पाहायला मिळालं अगदी मारामारी पर्यंत प्रकरण पोहोचलं आणि यात चर्चा झाली ते फुलेरा गावचा पाहुणा असलेल्या आसिफ खानचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं.

आसिफ खानचा स्ट्रगल

फुलेराच्या जावयाची भूमिका साकारणाऱ्या आसिफ खानने बराच स्ट्रगल केला आहे. आसिफचा अभिनयाच खूप कौतुक झालं पण तुम्हाला माहितीये का ? आसिफने बॉलिवूडमधील करिना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये किचन हेल्पचं काम केलं होतं.

अभिनय करण्यापूर्वी केलं छोटं काम

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आसिफ खानने त्याच्या स्ट्रगलविषयी बराच खुलासा केला. त्याने सांगितलं कि, अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी त्याने अनेक छोटी छोटी कामं केली. त्यासाठी आसिफ मुंबईत आला आणि वडिलांच्या निधनानंतर अनेक छोटी मोठी कामं केली होती. २०१० साली त्यांच्या आईने त्याला अभिनय करण्याची परवानगी दिली.

पण अभिनयक्षेत्रात काम करताना मुंबईत स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याने एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर जेव्हा सैफ आणि करिनाचं लग्न पार पडलं तेव्हा त्या लग्नात त्याने किचन हेल्पच काम केल्याची आठवण शेअर केली.

काही काळाने त्याने ती नोकरी सोडली आणि एका मॉलमध्ये काम सुरु केलं. याच दरम्यान त्याने अभिनय क्षेत्रात ऑडिशन देण्यास सुरुवात केली आणि राजस्थान मधील एका थिएटर ग्रुपमध्ये त्याने काम सुरु केलं. त्यानंतर त्याने कास्टिंग असिस्टंट म्हणून काम सुरु केलं आणि काही छोट्या-मोठया भूमिका करण्यासही सुरुवात केलं.

पंचायत ३ ची कास्ट

पंचायत ३ मध्ये रघुबीर यादव, जितेंद्रकुमार, नीना गुप्ता, संयुक्ता यांच्या या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. या आधीच्या दोन सीजननेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता प्रेक्षक चौथ्या सीजनची वाट पाहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT