jitendra kumar  sakal
Premier

'Panchayat ३' वरील मानधनाच्या बातम्यांवरून भडकला जितेंद्र कुमार; म्हणतो- तुम्हाला माहिती देणारे...

Panchayat 3 jitendra kumar: पंचायत ३ साठी जितेंद्र कुमारने नीना गुप्ता यांच्यापेक्षा जास्त मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'पंचायत ३' या वेबसीरिजने प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. जितकी लोकप्रियता पंचायतच्या पहिल्या दोन भागांना मिळाली होती. तेवढीच लोकप्रियता ही तिसऱ्या सीझनला देखील मिळत आहे. पहिले दोन सीझन सुपरहिट ठरल्यानंतर आता तिसरा सीझन जोरदार गाजतोय. या भागाची कथा, कलाकार, अभिनय सगळंच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यानंतर सध्या आणखी एक गोष्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे ती म्हणजे सीरिजमधील कलाकारांचं मानधन. त्यातही सीरीजमधील मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार म्हणजेच सगळ्यांचे लाडके सचिवजी यांनी या सीरिजसाठी सगळ्यात जास्त मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय, मात्र आता यावर स्वतः जितेंद्रने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

भलेही पंचायतच्या या सीझनमध्ये काही नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र त्यांच्यासोबतच मंजूदेवी आणि सचिवजी देखील पुन्हा दिसले. त्यांनी पुन्हा आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. मात्र अशातच जितेंद्रने नीना गुप्ता यांच्यापेक्षा जास्त मानधन घेत सीरिजच्या एका भागासाठी ७० हजार रुपये इतकी फी घेतल्याचं सांगितलं गेलं. त्याने या सीझनसाठी एकूण ५ लाख ६० हजार रुपये इतकं मानधन घेतलं असल्याच्या चर्चा आहेत. तर नीना गुप्ता यांना एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता या सगळ्या अफवा असल्याचं जितेंद्रने सांगितलं आहे. याबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाला, 'मला वाटतं की कुणाच्याही पगार आणि आर्थिक गोष्टीबद्दल आपण चर्चा करणं मुळीच योग्य नाही.'

जितेंद्र म्हणाला, 'अशा चर्चांमधून काहीही मिळत नाही. त्या फक्त चर्चाच असतात. त्यामुळे मला वाटतं की कुणीही अशाप्रकारच्या अफवांमध्ये पडू नये. अशा कोणत्याही चर्चा व्हायला नकोत.' 'पंचायत ३' हिट झाल्यानंतर आता जितेंद्र 'कोटा फॅक्टरी ३'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ही सीरिज २० जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदेंना धक्का बसणार? ठाकरेंच्या वकिलांचा तगडा युक्तिवाद

ODI World Cup 2027: सुनील गावस्करांनी वन डे वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला; ६ फलंदाज, ४ ऑलराऊंडर अन् ५ गोलंदाज

STAR PRAVAH NEW SHOW: उठा, सूठा आणि मला बेटावर भेटा! स्टार प्रवाहवर येतोय नवा कार्यक्रम; प्रोमो पाहिलात का?

Latest Marathi News Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी २ वाजता

SCROLL FOR NEXT