Panchayat 3 esakal
Premier

Panchayat 3: 'पंचायत 3'मध्ये येणार मोठा ट्विस्ट, फुलेरामध्ये येणार नवा सचिव? त्रिपाठीजींची जागा कोण घेणार?

Panchayat 3: 'पंचायत' या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

priyanka kulkarni

Panchayat 3: ओटीटीवरील 'पंचायत' (Panchayat) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमध्ये फुलेरा नावाच्या एका गावाची कथा दाखवण्यात आली आहे, जी प्रेक्षकांची मनं जिंकते. 'पंचायत' या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच आता 'पंचायत 3' (Panchayat-3 ) या वेब सीरिजमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

'पंचायत 3' या वेब सीरिजची झलक चाहत्यांना अलीकडेच पाहायला मिळाली. अॅमेझॉन प्राइमने काही दिवसांपूर्वी त्यांच्या 2024-25 च्या आगामी प्रोजेक्ट्सची यादी जाहीर केली, ज्यामध्ये 'पंचायत 3' या वेब सीरिजची देखील झलक दाखवण्यात आली. पण ही झलक पाहिल्यानंतर वेब सीरिजच्या कथेबद्दल कोणताही अंदाज लावला जाऊ शकत नाही. पण आता शोच्या नव्या सीझनमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रिपोर्टनुसार,'पंचायत'या वेब सीरिजच्या कथेमधील फुलेरा गावात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. फुलेरा गावाचे सचिव अभिषेक त्रिपाठी यांची बदली होणार आहे. आता सचिव जी यांची जागा कोण घेणार आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कोण होणार फुलेरा गावाचा नवा सचिव?

अभिनेता आसिफ खाननं पंचायत वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये गणेश नावाची भूमिका साकारली. जो फुलेरा गावातील रवीना या मुलीशी लग्न करतो. लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या गणेशचा सचिव जीसोबत वाद होतो.

गणेश आता फुलेराचा नवा सचिव होणार आहे,असं म्हटलं जात आहे. याबद्दल अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र असे खरोखर घडले तर फुलेरा गावाची कथा रंजक होणार आहे.

कधी रिलीज होणार पंचायत-3?

जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैजल मलिक आणि चंदन रॉय या कलाकारांनी पंचायत या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. आता पंचायत-3 ही वेब सीरिज कधी रिलीज होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : सोलापूरच्या मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT