Panchayat 3 sakal
Premier

Panchayat 3: रेल्वे स्टेशनवर काढले दिवस अन् जेवणाची होती भ्रांत; 'पंचायत-3'मधील प्रल्हादचा खडतर प्रवास, 'गँग्स ऑफ वासेपूर' सोबत आहे खास नातं

पंचायत-3 मधील प्रल्हाद ही भूमिका साकारुन फैजल मलिक (faisal malik) घराघरात पोहोचला आहे.

priyanka kulkarni

Panchayat 3: सध्या पंचायत-3 (Panchayat 3) या वेब सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बरेच प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत होते. पंचायत या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझन प्रमाणेच तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंचायत-3 ही वेब सीरिज रिलीज होताच अनेकांनी बिंच वॉच केली. अशातच या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पंचायत-3 मधील प्रल्हाद ही भूमिका साकारुन फैजल मलिक (faisal malik) घराघरात पोहोचला आहे. फैसलच्या पंचायत-3 मधील अभिनयाचं लोक भरभरुन कौतुक करत आहेत. फैजलनं अभिनय क्षेत्रात विशेष ओळख निर्माण करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना केला आहे. जाणून घेऊयात त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

22 व्या वर्षी मुंबईत आला

22 व्या वर्षी फैजलनं अभिनेता होण्यासाठी मुंबई गाठली. फैजलला मुंबईत आल्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशनवर काढावे लागले. एका मुलाखतीत फैजलनं सांगितलं होतं की, तो दहा रुपये देऊन रेल्वे स्टेशनवर झोपत होता. फैजलकडे जेवण करण्यासाठी देखील पैसे नव्हते. फैजल आर्थिक अडचणींचा सामना करत होता, त्यावेळी त्याला एका टीव्ही चॅनेलमध्ये नोकरी मिळाली. तो एडिटिंग देखील शिकला.

अनुराग कश्यपशी ओळख झाली अन् करिअरला नवी दिशा मिळाली

फैजल हा एडिटर म्हणून काम करु लागला. अशातच त्याची भेट फिल्ममेकर अनुराग कश्यपसोबत झाली. फैजलनं अनुरागकडे प्रोड्युसर होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी अनुराग आणि फैजल यांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली. पण नंतर ती कंपनी बंद पडली.

अनुराग कश्यप आणि फैजलची प्रोडक्शन कंपनीला यश मिळालं नाही पण अनुरागनं मात्र फैजलची साथ सोडली नाही. अनुरागनं त्याच्या फैजलला गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. गँग्स ऑफ वासेपूर सिनेमात फैजलनं इन्स्पेक्टर गोपाल सिंगचं पात्र साकारलं.

faisal malik

'पंचायत-3' मुळे मिळाली लोकप्रियता

फ्रॉड सैयां, डेढ़ बिगहा ज़मीन,मस्त में रहने का यांसारख्या चित्रपटांमध्ये फैजलनं काम केलं पण 'पंचायत-3' या वेब सीरिजमधील प्रल्हाद पांडे या भूमिकेमुळे फैजलला लोकप्रियता मिळाली आहे. या सीरिजमधील त्याच्या डायलॉग्सनं आणि अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.

faisal malik

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

SCROLL FOR NEXT