Premier

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Panchayat 3 Release Date Out: 'पंचायत' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सीरिजची रिलीज डेट जाहीर केल्यानं प्रेक्षक खुश झाले आहेत.

priyanka kulkarni

Panchayat 3 Release Date Out: फुलेरा गावतील गावकऱ्यांचे किस्से आता प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळणार आहेत. कारण पंचायत (Panchayat 3) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'पंचायत' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सीरिजची रिलीज डेट जाहीर केल्यानं प्रेक्षक खुश झाले आहेत. पंचायत या वेब सीरिजचा तिसरा सीझन कधी आणि कुठे पहायला मिळणार आहे? हे जाणून घेऊयात...

'पंचायत' या वेब सीरिजच्या दोन सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट जाहीर करण्यासाठी या सीरिजच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये प्रेक्षकांना काही दुधीभोपळ्याचे इमोजी हटवायचे होते. दुधीभोपळा आणि पंचायत या वेब सीरिजचं खास कनेक्शन आहे. हे कनेक्शन काय आहे? हे तुम्हाला वेब सीरिज पाहिल्यानंतर समजेल. अनेक नेटकऱ्यांनी पंचायत वेब सीरिजच्या मेकर्सचा हा टास्क खेळला. त्यानंतर या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

कधी रिलीज होणार पंचायत-3?

पंचायत-3 ही वेब सीरिज 28 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करुन पंचायत-3 या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "तुम्ही लौकी हटवली अन् आम्ही तुम्हाला रिवॉर्ड दिला."

पंचायत वेब सीरिजची स्टार कास्ट

पंचायत या वेब सीरिजमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार हा सचिवा जी ही भूमिका साकारतो. तर, नीना गुप्त, रघुबीर यादव, चंदन रॉय आणि फैसल मलिक हे देखील या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT