Panchayat 3 eSakal
Premier

Panchayat 3 Twitter Review: पुन्हा 'पंचायत' नं प्रेक्षकांची मनं जिंकली, पण यंदा जितेंद्र कुमार नाही तर 'या' अभिनेत्याचं होतंय कौतुक

Panchayat 3: अनेक नेटकऱ्यांनी पंचायत वेब सीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाल्यानंतर काही तासाच बिंच वॉच केला.

priyanka kulkarni

Panchayat 3 Twitter Review: गेल्या काही दिवसांपासून पंचायत या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची (Panchayat 3) प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अशातच काल रात्री 12 वाजता पंजायत-3 ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. पंचायत या वेब सीरिजच्या दोन सीझन प्रमाणेच तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी पंचायत वेब सीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाल्यानंतर काही तासाच बिंच वॉच केला. अशातच काही नेटकऱ्यांनी या वेब सीरिजचा रिव्ह्यू देखील ट्विटरवर (X) शेअर केला आहे.

पंजायत-3 पाहिल्यानंतर काय म्हणाले नेटकरी?

पंचायत-3 ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर (prime video) रिलीज झाली. अशातच ही वेब सीरिज पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या वेब सीरिजचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक जण वेब सीरिजमधील फैसल मलिकच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "पंचायत-3 मधील मलिक भाईंचा परफॉर्मन्स खास आहे. अजून दोन एपिसोड बघणं बाकी आहेत. पण खूप छान सीरिज आहे. प्रत्येकानेच चांगले काम केलं आहे पण फैसल भाईंची गोष्टच वेगळी आहे."

एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "नुकतीच पंचायत वेब सीरिज पाहिली. खूप मनोरंजक वेब सीरिज आहे. आता आम्ही चौथ्या सीझनची वाट बघत आहोत."

"मलिक सर तुम्ही पंचायत-3 मध्ये खूपच छान काम केले आहे. आम्ही प्रत्येक सीनमध्ये तुमची भावना समजू शकतो. प्राइम व्हिडीओ, तुम्ही हा शो असाच सुरु ठेवा", असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांनी पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये फुलेरा गावाची कथा दाखवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Patkar: ''मला अर्ज भरु दिला नाही'', अभिनेता विजय पाटकर यांचे मंत्र्याच्या ओएसडींवर गंभीर आरोप

Air India Building: एअर इंडिया इमारत सरकार खरेदी करणार; डील लवकरच पूर्ण होणार, कारण काय?

Mumbai Bengaluru Express Railway : मुंबई -बंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणेकरांना जलद सेवा, असे असेल वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन; राज्यभरात राजकीय वातावरण तापलं

Instagram Teleprompter Feature: आता Reels बनवणं होणार अगदी सोपं! Instagramचं नवं फीचर चर्चेत; 'असं' वापरलं तर झटपट वाढतील फॉलोवर्स

SCROLL FOR NEXT