durgesh kumar  esakal
Premier

'पंचायत'मधील अभिनेत्याने मुंबईत खरेदी केलं स्वप्नातलं घर; चावीचा फोटो शेअर करत म्हणतो-

Panchyat Actor New Home: अखेर 'पंचायत' सीरिजमधील लोकप्रिय अभिनेत्याने आता मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Payal Naik

चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेली 'पंचायत' ही सीरिज सोशल मीडियावरही चांगलीच गाजली. या सीरिजच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. काही महिन्यांपूर्वीच या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरीजने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. अनेक कलाकारांचं आयुष्य बदललं. सीरीजमुळे कलाकारांच्या करिअरला कलाटणी तर मिळालीच सोबतच आर्थिक स्थैर्यदेखील मिळालं. आता याच सीरिजमधील एका कलाकाराने स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे तेही मुंबईत. त्याने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. आता चाहतेही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

स्वतःचं हक्काचं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकारांनी स्वतःचं घर घेत चाहत्यांना गुड न्यूज दिली. आता 'पंचायत' मधील बनराकस म्हणजेच अभिनेता दुर्गेश कुमार याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. दुर्गेश कुमार याने बनराकस बनून चाहत्यांची मनं जिंकली. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दुर्गेशने त्याच्या नव्या घराची चावी दाखवत आपण नवीन घर घेतल्याचं सांगितलं. त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. या क्षेत्रात अभिनेत्याने १० वर्षाहून अधिक कला स्ट्रगल केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलेलं की कसं कठीण परिस्थितीमुळे तो नैराश्यात गेला होता.

आता अखेर त्याने आपलं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत त्यांनी लिहिलं, 'आमचं घर, मुंबईत, धन्यवाद. बाबूजी हरे कृष्णा चौधरी आशीर्वादासाठी' त्याने घराबद्दल जास्त माहिती दिली नसली तरी चाहते आता त्याचं अभिनंदन करत आहेत. सीरिजमध्ये पश्चिम बाजूच्या फुलेरा मध्ये घरासाठी खूप वाद झाला होता. मात्र आता खऱ्या आयुष्यात पश्चिम फुलेरामध्ये राहणाऱ्याला घर मिळालं अशा प्रतिक्रिया आता चाहते देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT