paresh rawal  sakal
Premier

'हे संपूच नये असं वाटतं' म्हणत परेश रावल यांनी शेअर केला तो व्हिडिओ; नेटकरी चकीत, म्हणतात- हे वागणं...

Paresh Rawal Troll: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते परेश रावल हे त्यांच्या अभिनयासाठी आणि भूमिकांसाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भूमिकांचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं. मात्र सध्या त्यांच्यावर नेटकरी प्रचंड नाराज आहेत. त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. परेश यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे त्यांना ट्रोल केलं जातंय. अनेक नेटकऱ्यांनी परेश यांना स्पष्ट शब्दात या गोष्टीचा जाब विचारला आहे. हे नेमकं काय आहे असा प्रश्न आता नेटकरी विचारताना दिसतायत. हा व्हिडिओ नेमका काय आहे? यावरून इतकं वातावरण का तापलं आहे हे जाणून घेऊया.

परेश यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात 'मालेना' नावाच्या चित्रपटातील एक सीन दिसत आहे. या सीनमध्ये काही शाळकरी मुलं एका स्त्रीला पाहण्यासाठी कशाप्रकारे धडपडत तिचा अगदी घरापर्यंत पाठलाग करतात हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर यापैकी एका मुलाला या महिलेशिवाय काहीच सूचत नाही. तो तिच्या घरासमोर जाऊन बसतो. त्यावेळी अचानक ती घराचा दरवाजा उघडून त्याला जवळ बोलवते. त्याला पैसे देताना ती नाणी तिच्या पायाशी टाकते.

ही नाणी उचलताना या मुलाची नजर तिच्या उघड्या मांड्यांवर पडते आणि तो उत्तेजित होतो. नंतर हे स्वप्न असल्याचं पुढच्याच दृष्यात स्पष्ट होतं. मात्र नंतर हा मुलगा सगळीकडे या महिलेचा पाठलाग करतो. त्यानंतर तो तिला चोरटा स्पर्श करताना देखील दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, 'ओह माय गॉड... हे फारच सुंदर, अंतरंग प्रफुल्लित करणारं आहे. हा व्हिडिओ कधीच संपायला नको होता.' या व्हिडिओवरून आता नेटकरी परेश यांना सुनावताना दिसतायत.

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'अकाऊंट स्विच करायला विसरले वाटतं.' दुसऱ्याने लिहिलं, 'कोणत्याही मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तीने असं काही पोस्ट केल्याचं यापूर्वी पाहिलेलं नाही. याबद्दल काय बोलावं, आपण फार विचित्र जगात राहतो.' आणखी एकाने लिहिलं, 'तुमचं काहीतरी चुकतंय' तर अनेकांनी त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT