parineeti chopra reveals her love story she fall in love at first meeting with Raghav Chadha Sakal
Premier

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अमरजोत कौरची भूमिका साकारण्यासाठी तिने सुमारे १६ किलो वजन वाढवले होते. चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सतत चर्चेत असते.

सकाळ वृत्तसेवा

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अमरजोत कौरची भूमिका साकारण्यासाठी तिने सुमारे १६ किलो वजन वाढवले होते. चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही ती सतत चर्चेत असते.

अलीकडेच, तिने राघव चढ्ढासोबतच्या तिच्या प्रेमकथेबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत परिणीतीने सांगितले की, त्यांची पहिली भेट लंडनमधील एका कॉन्फरन्समध्ये झाली होती, त्यांच्यामध्ये तेव्हा लग्नाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; पण त्यांच्या पहिल्या डेटच्या पाच मिनिटांनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

परिणीती म्‍हणाली की, ‘‘सहसा मी फक्त हॅलो म्हणते आणि पुढे जाते; पण चला नाश्त्याला भेटू, असे मी राघवला म्हणाले. त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले असल्‍याचे माझ्या लक्षात आले.’’ इम्तियाज अली दिग्दर्शित ‘अमर सिंह चमकीला’मध्ये परिणीती चोप्राने पहिल्यांदाच दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. यापूर्वी ती २०२३ मध्ये अक्षय कुमारसोबत ‘मिशन रानीगंज’मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. आता परिणीती तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT