usha nadkarni sakal
Premier

Usha Nadkarni: इतका मोठा नट पण मांडी घालून... विजय सेतुपतीचं उदाहरण देत उषा नाडकर्णींची मराठी कलाकारांवर टीका

Usha Nadkarni Talked About Marathi Industry: लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मुलाखतीत विजय सेतूपतीबद्दल सांगितलं आहे.

Payal Naik

मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अनेक हिट मालिका आणि चित्रपटात काम केलं. त्यांनी अनेक बड्या कलाकारांच्या आईच्या भूमिका साकारल्या. सध्या उषा नाडकर्णी या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी मराठी इंडस्ट्रीवर टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अभिनेता विजय सेतुपती याचं कौतुक करत तो सेटवर कसा वागतो हेदेखील सांगितलं आहे.

उषा यांनी नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना उषा म्हणाल्या, 'एका चित्रपटात मी विजय सेतुपतीच्या आईची भूमिका केली आहे. एवढा मोठा स्टार आहे पण एवढा गोड माणूस आहे ना. आमच्या मराठीत किंवा हिंदीमध्ये एवढंसं असंलं तरी एवढं करून सांगतात. पण तो एवढा मोठा माणूस असा जमिनीवर मांडी घालून बसायचा. आम्ही इतक्या गप्पा मारल्या दोघांनी. कारण तो माझा मुलगा झालेला मी त्याची आई झालीये. तो इतका साधा आहे. हे लोकांनी शिकलं पाहिजे. शेवटच्या दिवशी पॅकअप झालं ना, त्याने मला नमस्कार केला. तेव्हा मी त्याला असं उचललं, मी त्याचे गाल ओढले होते. कारण मला तो आवडला.'

पुढे उषा म्हणाल्या, 'कारण एवढा मोठा नट असून माज नाही ओ. नाहीतर आपल्याकडे एवढंसं असलं तरी माज किती असतो. अशी साधी माणसंसुद्धा आहेत.' त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. उषा या 'माहेरची साडी' या चित्रपटातील खाष्ट सासूच्या भूमिकेतून घराघरात पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांची 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील भूमिकाही प्रचंड गाजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT