smita shewale  sakal
Premier

माझ्यासाठी हा अवघड निर्णय... अखेर स्मिता शेवाळेने सांगितलं 'मुरांबा' मालिका सोडण्यामागचं कारण

Smita Shewale On Muramba Serial: लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने तिच्या व्हिडिओमध्ये मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Muramba Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका टीआरपी यादीत टॉप १५ मध्ये आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. मात्र गेल्या काही महिन्यात या मालिकेतील दोन कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. दुसऱ्या कलाकारांनी त्यांची जागा घेतली. पहिली अभिनेत्री होती काजल काटे. काजल मालिकेत आरतीच्या भूमिकेत होती. त्यानंतर अभिनेत्री स्मिता शेवाळे हिनेदेखील या मालिकेला रामराम ठोकला. स्मिता एक युट्यूब चॅनेल चालवते. या चॅनेलवरील व्हिडिओमध्ये तिने मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

का सोडली मालिका

स्मिता मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत होती. ती मालिकेतून निघाल्याने अनेकांनी तिला याचं कारण विचारलं होतं. तिने ही मालिका का सोडली, तिचे कुणासोबत वाद झाले का असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले. तिने तिच्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडली. स्मिता सिंगल मदर आहे. ती आपल्या मुलाचा एकटीने सांभाळ करते. तिचं पुण्यात घर आहे मात्र मालिकेच्या शूटिंगसाठी तिला महिन्यातले २० दिवस मुंबईत राहावं लागतं. त्यामुळे तिचं मुलाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यासोबत वेळ घालवता येत नाहीये. आता ती पुण्याला राहायला गेली आहे. तिथे स्मिताची आई तिच्या घराच्या जवळ आहे.

काय म्हणाली स्मिता?

मालिका सोडण्याचं कारण सांगताना स्मिता म्हणाली, 'आपल्या आयुष्यात असे काही निर्णय असतात जे परिस्थिती मुळे घ्यावे लागतात. कबीर खूप लहान असल्याने त्याला आई सांभाळू शकते आणि मी आगामी प्रोजेक्टमध्ये काम करू शकते.' पुढे स्मिता म्हणाली, 'अर्थात यामुळे मला कबीरलाही वेळ देता येईल कारण त्याचं हे जे वय आहे ते पुन्हा मागे नेता नाही येणार. मला आता त्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि मला त्याचं बालपण हरवू द्यायचं नाही म्हणून मी ही मालिका सोडतेय. आता स्मिता मुलासोबत पुण्यालाच राहणार आहे.' तिने दुसऱ्या जान्हवीला स्वीकारण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT