Phir Aayi Hasseen Dillruba  sakal
Premier

Phir Aayi Hasseen Dillruba Trailer: यावेळेस गोष्ट जरा पर्सनल आहे! विक्रांत- तापसीच्या 'फिर आई हसीन दिलरुबा'चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

Phir Aayi Hasseen Dillruba Release Date: अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर पाहून नेटकरी त्यांच्यावर फिदा झाले आहे.

Payal Naik

Hasseen Dillruba Sequel: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेस्सी यांच्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. तापसी आणि विक्रांत यांच्या हिट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट गणला जातो. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल 'फिर आई हसीन दिलरुबा'चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच काही तासात या ट्रेलरला लाखो विव्ह्यू मिळाले आहेत. चाहते या ट्रेलरवर फिदा झाले आहेत. या चित्रपटात आता दोन नवीन चेहऱ्यांची एंट्री झाली आहे.

ट्रेलरची सुरुवात होते ती राणीच्या डायलॉगने. रिशू आणि तिने आपल्या प्रेमासाठी काही वेड्यासारख्या गोष्टी केल्या आहेत असं ती म्हणते. नंतर विक्रांत म्हणतो, 'मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन पण अट एकच आहे, कुणी तिसरा व्यक्ती यात नकोय. त्यानंतर एंट्री हंगोटे ते सनी कौशलची. तो राणीच्या प्रेमात वेडा झालाय. राणीही त्याला आपल्या आयुष्यात येऊ देते. जसं रिशूला राणीच्या नव्या अफेअरबद्दल माहिती होतं तो त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी निघतो. इथे मगरीच्या हल्ल्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. तर शेवटी जिमी शेरगीलच्या एंट्रीने नवीन ट्विस्ट येतो. तो म्हणतो की आता तो सगळे प्रश्न विचारणार आहे कारण यावेळेस प्रकरण थोडं पर्सनल आहे.'

ट्रेलरवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिलंय, 'पहिला पार्ट मस्त होता आता दुसऱ्याची वाट पाहतोय.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'विक्रांत पहिल्या पार्टमध्ये मस्त होता. आता दुसऱ्यात काय होतंय हे पाहण्यासाठी मी आतुर आहे.' चाहते या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. 'फिर आई हसीन दिलरुबा' हा चित्रपट कनिका ढिल्लो यांनी लिहिला आहे. तर जयप्रसाद देसाई यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT