Poet narayan surve  sakal
Premier

Poet Narayan Surve: मला माहीत नव्हतं की... आधी वस्तू चोरल्या मग परत आणून ठेवल्या, कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरीची अजब घटना

Burglary At Poet Narayan Surve's House: पद्मश्री प्राप्त प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या नवी मुंबईतील घरी चोरी झाली. मात्र चोराने त्यांच्या चोरलेल्या वस्तू परत आणून ठेवल्या.

Payal Naik

Strange incident of theft at Poet Narayan Surve's house: आपल्या कवितांमधून वास्तववादी चित्रण, समाजाला आरसा दाखवणारे लोकप्रिय कविवर्य नारायण सुर्वे यांनी आयुष्याने दिलेले संघर्ष, अडचणी, हालअपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्या. त्यांचं मराठी साहित्यामध्ये मोठं योगदान आहे. मात्र आता त्यांच्या नवी मुंबई येथील घरी चोरी घडल्याची घटना समोर येते आहे. त्यातही गंमत अशी की हे घर नारायण सुर्वे यांचं आहे हे समजताच चोराने चक्क चोरलेल्या वस्तू परत आणून ठेवल्या आणि सोबत एक चिठ्ठी लिहीत माफीही मागितली. नेमकं काय घडलं?

नेरळ येथील गंगानगर परिसरात दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचं घर आहे. त्यांच्या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई राहतात. या घरात सुर्वे यांच्या अनेक आठवणी आहेत. ते दोघेही दहा दिवसांसाठी मुलाकडे गेले होते. घराचं दार बंद असल्याने चोरट्याने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे सापडले नाहीत. त्यामुळे त्याने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्य चोरायचं ठरवलं. मात्र, चोराला घराच्या भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. आपण चोरी करत असलेलं घर हे नारायण सुर्वे यांचं आहे हे त्याला समजलं.

त्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्याचं मन बदललं. चोराने नेलेल्या सगळ्या गोष्टी त्याने परत आणून ठेवल्या. त्यानंतर त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहीत त्यांची माफीही मागितली. त्याने चिठ्ठीत लिहिलं, 'मला माहीत नव्हतं की नारायण सुर्वे यांचे घर आहे, नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परत आणून ठेवला. सॉरी...' या प्रकरणाचा सध्या शोध सुरू आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोराने आणून ठेवलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे, सीसीटीव्ही यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT