prajatka mali  sakal
Premier

Ashadhi Wari 2024: हेच खरं सुख! टाळांच्या ठेक्यावर नाचली, फुगडी खेळली, वारीच्या रंगात रंगली मराठी अभिनेत्री

Prajakta Gaikwad In Wari: लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे वारीमधील काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

Payal Naik

हे सुख स्वर्गातही नाही असं ज्याचं वर्णन केलं जातं ती म्हणजे पंढरीची वारी. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला जायला निघतात. आपल्या घरादाराची चिंता त्या जगाच्या पाठीराख्याच्या खांद्यावर टाकून हे वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत निघतात. वारीतलं भारावून टाकणारं वातावरण, टाळ मृदूंगाच्या तालावर रंगून जाणारे वारकरी एकमेकांना सांभाळत आपली वारी पूर्ण करतात. दरवर्षी वारीत अनेक मराठी कलाकारांचा समावेशही असतो. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आता वारीच्या रंगात रंगली आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीच्या रंगात रंगली आहे. प्राजक्ताने येसूबाई बनून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता तिने तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात ती वारीचा आनंद घेताना दिसतेय. व्हिडिओमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नथीची सुंदर साडी नेसली आहे. एका व्हिडिओमध्ये ती कपाळावर अबीर गुलालाचा टिळा लावताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत ती घोड्याच्या सोबत दिसत आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये ती टाळ आणि मृदूंगाच्या तालावर ठेका धरताना दिसतेय.

ती इतर वारकऱ्यांसोबत नाचताना दिसतेय तर चिमुकल्याचा हात पकडून फुगडी घालताना दिसतेय. फुगडी झाल्यावर ती चिमुकल्याच्या पाया पडतेय. तिच्या मैत्रिणीसोबतही ती फुगडी घालताना दिसतेय. तिच्या या व्हिडिओवर चाहतेही कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तू खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपतेयस असं म्हणत अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT