phulvanti esakal
Premier

Phulvanti: दागिन्यांचा साज, डोळ्यात धाक, प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाची तारीख जाहीर, वाचा कधी येतेय ही अप्सरा

Prajakta Mali Phulvanti Movie Release Date: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या वाढदिवशीच आगामी चित्रपटाची तारीख सांगितली आहे.

Payal Naik

Phulvanti Movie Release Date: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यानेदेखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्राजक्ता अभिनेत्री आणि नृत्यांगना तर आहेच सोबतच एक बिझनेस वुमनदेखील आहे. तिने दोन वर्षांपूर्वी 'प्राजक्तराज' या दागिन्यांच्या ब्रँडची निर्मिती केली होती. त्यानंतर तिने 'प्राजक्तकुंज' नावाचा एक फार्म हाऊस खरेदी केला आणि तोदेखील रेंटवर द्यायला सुरुवात केली. आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण काहीतरी मोठी गोष्ट शेअर करणार असल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता अखेर तिचं सरप्राइझ समोर आलं आहे. प्राजक्ताने तिच्या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे.

प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली होती. तो चित्रपट म्हणजे 'फुलवंती'. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित 'फुलवंती' हा चित्रपट लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शित करत आहेत. तर स्वतः प्राजक्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. मेण्यात बसलेली प्राजक्ता पाहून सगळेच भुलले आहेत. गुलाबी रंगाची नक्षीदार साडी आणि दागिन्यांचा थाट असलेली फुलवंती ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'फुलवंती'बद्दल प्राजक्ता माळी म्हणते, '' या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले; याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. 'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की 'फुलवंती'च का ? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले; साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती.'

ती पुढे म्हणाली, 'मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. 'फुलवंती'मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. 'फुलवंती' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT