Phullwanti  Esakal
Premier

Phullwanti Movie : "ज्या क्षणाची मी वाट पाहत होते..." ; प्राजक्ताच्या फुलवंती सिनेमाचं शूटिंग संपलं , सिनेमाच्या शुटिंगचे खास बिहाईंड द सीन्स आणि Wrap Up पार्टीचे क्षण

Phullwanti Movie Wrap Up Party : अभिनेत्री प्राजक्ता माळीची निर्मिती असलेल्या फुलवंती सिनेमाचं शूटिंग पार पडलं असून या सिनेमाची रॅप अप पार्टी थाटात पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

Prajakta Mali : महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळी कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तिचे लेटेस्ट फोटोशूट्स असो किंवा सोशल मीडिया पोस्ट कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना असलेली प्राजक्ता आता निर्माती म्हणून सिनेविश्वात पदार्पण करतेय. प्राजक्ताच्या शिवोहम या संस्थेची निर्मिती असलेला फुलवंती हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या सिनेमाचं शूट पूर्ण झाली आणि सिनेमाच्या टीमने एकत्र येत रॅप अप पार्टी केली.

सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्राजक्ताने या रॅप पार्टीचा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शुटिंगचे खास बिहाइंड द सीन्स आणि रॅप अप पार्टीवेळी सगळ्यांनी केलेली धमाल पाहायला मिळतेय. यावेळी प्राजक्ताने पोस्टमधून तिच्या भावनाही व्यक्त केल्या.

पोस्टमध्ये ती म्हणाली,"ज्या क्षणाची मी गेलं पुर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते; तो क्षण. फुलवंती सिनेमाचा शूटिंग अखेर संपलं आहे. ‘निर्माता’ आणि ‘एक्झिक्युटर’ म्हणून ‘फुलवंती’ चित्रपटाचे दुसरं शेड्युलचं शूटिंग पूर्ण झालं. “शिवोहम क्रिएशन्सचा पहिला प्रकल्प. सर्व काही उत्तम पार पडलं. 'फुलवंती' हा माझ्यासाठी खूप खास प्रकल्प आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष दिलं आहे. तसेच या प्रकल्पाने मला जीवनातील सर्वात खोल आणि शहाणपणाचे धडे शिकवलं. मला प्रचंड शक्ती, स्वातंत्र्य दिलं आणि माझं रूपांतर या काळात एका योद्ध्यात झालं. जे या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले, पाठिंबा दिला आणि मदत केली त्यांची मी आभारी आहे. ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केलं आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे पुरेसे आभार मी मानू शकत नाही. शेवटी, या सगळ्या गोष्टींनी मला मदतच केली. आम्ही शिकलो आणि आम्ही वाचलो! तसेच मला खरोखर माहिती आहे, आपण जे साध्य करू शकलो ते मानवी दृष्ट्या शक्य नाही, एक अतिशय शक्तिशाली दैवी ऊर्जा या प्रकल्पाला मार्गदर्शन, संरक्षण आणि चालवत होती. #गुरुदेव त्या ऊर्जेबद्दल सदैव कृतज्ञ. " असं म्हणत तिने तिच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत प्राजक्ताच अभिनंदन केलं आणि हा सिनेमा पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत असं म्हंटल. प्राजक्ताची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचाही पहिला सिनेमा आहे. या सिनेमात फुलवंती ही भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रदर्शित होण्यापूर्वीच 'खलिद का शिवाजी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ! पुण्यात प्रदर्शित होणार नाही

दादा एक गुड न्यूज आहे फेम अभिनेत्याचं दिग्दर्शनात पदार्पण; मुंबईत पार पडणार महापूर नाटकाचा शुभारंभ

Video: मद्यधुंद पोलिस निरीक्षकाचा भररस्त्यात तमाशा; लोक म्हणाले, दोन पावले चालून दाखवा अन् पुढं जे घडलं... व्हिडिओ व्हायरल

PMPML Bus: डबलडेकरचा प्रायोगिक ‘प्रवास’; ‘आयटी पार्क’ परिसरात मार्गांचे लवकरच होणार सर्वेक्षण

Viral Post: व्हिसा मंजूर!' पण आधी 'या' 9 प्रश्नांची तयारी करा; स्टार्टअप संस्थापकाने दिले टिप्स

SCROLL FOR NEXT