yash pradhan  sakal
Premier

झाडूवाल्याने मला न्यूड अवस्थेत... 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्याने सांगितली त्याच्याबद्दलची सगळ्यात वाईट अफवा

Yash Pradhan Talked About Worst Rumour: माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्याने मुलाखतीत त्याच्याबद्दलची सगळ्यात वाईट अफवा सांगितली आहे.

Payal Naik

इंडस्ट्रीत काम करताना अनेक कलाकार एकमेकांचे चांगले मित्र होतात. मग ते स्त्री असोत किंवा पुरुष. त्यांच्यातील मैत्री वर्षानुवर्षे टिकते. एकाच मालिकेत वर्षानुवर्षे काम केल्याने कलाकारांचं इतरांशी चांगलं बॉण्डिंग जुळतं. मात्र पाहणारे या मैत्रीचा वेगळा अर्थ लावतात. विशेषतः ती मैत्री स्त्री आणि पुरुषाची असेल. असंच काहीसं घडलं 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील कलाकारांसोबत. अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि अभिनेता यश प्रधान यांनी असाच काहीसा अनुभव घेतला. त्यांचं नाव एकेमेकांशी जोडलं गेलं. आणि त्यांच्याबद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या गेल्या. एका मुलाखतीत यशने त्या अफवांबद्दल सांगितलं आहे.

यश आणि श्वेता खूप चांगले मित्र आहेत. मात्र त्यांचं अफेअर आहे असं इंडस्ट्रीत पसरवलं गेलं. नुकतीच यश आणि श्वेता यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत यश म्हणाला, ' इंडस्ट्रीत तीन गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात त्या म्हणजे क्रिकेट, गॉसिप आणि सेक्स. या तीन गोष्टी चघळण्यात इंडस्ट्रीला खूप मोठा इंटरेस्ट असतो. श्वेता आणि मी खूप चांगले मित्र आहोत. पण सेटवर आमच्याबद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. त्यातलीच एक पहिली अफवा म्हणजे मी सेटवर झाडूवाल्याला विवस्त्र सापडलो. म्हणजे मी आणि श्वेता एका खोली होतो आणि सकाळी तो झाडू काढायला आला आणि मी त्याला नेकेड दिसलो. ही माझ्याबद्दलची पहिली अफवा जी मी ऐकली.'

पुढे यश म्हणाला, 'मी लगेच माझ्या बायकोला फोन केला आणि सांगितलं हे बघ अशी अशी अफवा आहे. श्वेतासुद्धा तिथेच होती. सगळेच होते. पलीकडून ती खूप हसायला लागली. तिला ठाऊक होतं असं काहीच नाहीये. आम्ही फक्त हसत होतो. म्हटलं आपण आलो आहोत इंडस्ट्रीमध्ये आता अशा अफवा ऐकण्याचीही तयारी ठेवायची. दिवसभर तुम्ही एक इमेज घेऊन फिरत असता. गंभीर, विनोदी असे खोटे भाव तुमच्या चेहऱ्यावर आणावे लागतात. पण इतरवेळी मी माझं आयुष्य जगतो.' यश सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत हर्षवर्धनची भूमिका साकारतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT