Priya Bapat esakal
Premier

Priya Bapat: "त्यानं माझ्या छातीला हात लावला अन्..."; प्रिया बापटनं सांगितला धक्कादायक अनुभव

Priya Bapat: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रियानं तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. प्रियानं मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. तसेच तिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. प्रिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध मुलाखतींमध्ये सांगत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रियानं तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे.

प्रियानं सांगितली धक्कादायक घटना

प्रियानं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "मी एकदा शूट संपवून घरी जात होते. तेव्हा माझ्या हातात पिशव्या होत्या. मी फोनवर बोलत-बोलत चालत होते. त्याच वेळी अचानक एक माणूस माझ्यासमोर आला. त्याने माझ्या छातीला हात लावला आणि एका क्षणातच तो तिथून पळून गेला. मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. नेमकं काय घडलं? हे समजायलाच मला काही वेळ लागला."

"ती घटना घडल्यानंतर मी घरी आले. माझी आई घरी नव्हती.तेव्हा बाबा घरी होते.मी घरी आल्यानंतर रडत होते. त्यामुळे बाबा मला काय झालं विचारत होते? त्यांना काय सांगावं हेच मला कळत नव्हतं. मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. जे काही घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं, त्याक्षणी त्यांना असहाय्य सुद्धा झाले होते. त्या घटनेचा राग मला अजून आहे, आता लोकांची नजर जर मला वाईट वाटली किंवा मला असं वाटली की, हा माणूस मला हात लावणार आहे, तर मी त्याचा हात धरुन मारेन, इतका राग माझ्या मनात आहे." , असंही प्रियानं सांगितलं.

प्रियाच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "अशा घटनांमुळे आपल्याला प्रश्न पडतो - पुरुषांना यातून काय मिळते? आम्हाला असहाय्य वाटतं आणि ते आनंद घेतात" असं प्रिया बापटनं सांगितलं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT