Priyanka Chopra esakal
Premier

Priyanka Chopra: प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट; देसी गर्लनं ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर

Priyanka Chopra: प्रियांकाचा 'टायगर' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. याबाबत प्रियांकानं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

priyanka kulkarni

Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच आता प्रियांकानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रियांकाचा 'टायगर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत प्रियांकानं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

प्रियांकानं शेअर केली पोस्ट

प्रियांकानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "‘टायगर’… एक कथा जी जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर आणते, जसे की, प्रेम, संघर्ष, भूक आणि बरेच काही."

प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट

"भारतातील जंगलात, जिथे लहान-मोठे, प्राणी फिरतात, तिथे अंबा राहते. अंबा ही एक वाघीण आहे. ती आपल्या शावकांची इतक्या प्रेमाने काळजी घेते. या सुंदर कुटुंबावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचं शूटिंग 8 वर्षांहून अधिक काळ सुरु होतं. या अविश्वसनीय कथेला voice over देताना आणि या चित्रपटाद्वारे जंगल एक्सप्लोर करताना मला खूप मजा आली.", असंही प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिलं.

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘टायगर' हा चित्रपट या वसुंधरा दिनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी डिज्नी नेचरवर रिलीज होणार आहे.

'टायगर' या चित्रपटाला प्रियांका चोप्रा voice over देणार आहे चित्रपटाची कथा अंबा नावाच्या एका वाघिणीवर आधारित आहे, जी भारताच्या जंगलात आपल्या शावकांना वाढवत आहे. प्रियांका चोप्राने याआधी 'टू किल अ टायगर' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. आता तिच्या 'टायगर' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT