Ramesh Pardeshi sakal
Premier

Ramesh Pardeshi: मॉलच्या बाथरुममध्ये तरुणींचे ड्रग्स सेवन; पिट्या भाई व्हिडीओ शेअर करत म्हणाला,"पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून..."

Pune Drug Case Update: व्हिडीओमध्ये दोन तरुणी एका मॉलच्या बाथरूममध्ये ड्रग्सचं सेवन करताना दिसत आहेत.

priyanka kulkarni

Ramesh Pardeshi: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील (Pune) ड्रग्स प्रकरणांमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. ही चिंतेची बाब आहे. अशातच आता मुळशी पॅटर्न फेम अभिनेते रमेश परदेशी यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एका मॉलच्या बाथरूममध्ये ड्रग्सचं सेवन करताना दिसत आहेत. रमेश परदेशी यांनी हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

रमेश परदेशी यांची पोस्ट

मुळशी पॅटर्न या चित्रपटात पिट्या भाई ही भूमिका साकारणारे अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पुण्यातील ड्रग्स प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "आधी ललित पाटील,आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूम मध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अश्या प्रकारच वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केल ते तर पब्लिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूम मध्ये हे करतायत बिनधास्त. आणि त्यांच सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले ही तक्रार करून माझे माझ्या कुटुंबाच मानसिक स्वास्थ्य घालावल असो.

Ramesh Pardeshi

"आपले आपल्या शहराकडे आपल्या आणि आजुबाजूला असणार्‍या मुलांमुलीकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? की फक्त प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? आणि करणार असाल तर डोळे,कान उघडे करून फिरा. आणि सगळे जण मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू... मी पुणेकर माझं शहर माझा अभिमान... माझी जबाबदारी... (कृपया राजकीय कमेंट नको)", असंही रमेश परदेशी यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT