Pushpa 2 New Song  Esakal
Premier

Pushpa 2 New Song : 'अंगारो-द कपल साँग' वर थिरकले रश्मिका-अल्लू अर्जुन; BTS व्हिडीओ व्हायरल

रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा २' सिनेमाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलंय.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित सिनेमा 'पुष्पा २' चं नवीन गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. 'पुष्पा' मधील रश्मिकावर शूट झालेलं सामी गाणं चांगलंच गाजलं होत याच पार्श्वभूमीवर या सिनेमाचं लिरिकल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलंय.

अनेक भाषांमध्ये गाणं रिलीज

विशेष म्हणजे हे गाणं हिंदी, तामिळ, तेलगू या तीन भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने रिलीज झालं आहे. तेलुगूमध्ये सुसेकी, तमिळमध्ये नोडोका आणि हिंदीमध्ये अंगारो या नावाने रिलीज झालंय. श्रेया घोषालने हे गाणं गायलं असून याला द कपल सॉंग असं नाव देण्यात आलंय.

गायिका श्रेया घोषालने या तिन्ही भाषांमध्ये गाणं गायलंय पण तिन्ही भाषांमध्ये या गाण्याचं लेखन वेगवेगळ्या गीतकारांनी केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

पहा गाणं:

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री

सोशल मीडियावर रिलीज केलेल्या गाण्यात या संपूर्ण गाण्याची रिहर्सल आणि बिहाइंड द सीन्स पाहायला मिळत आहेत. अल्लू आणि रश्मिकाने पदरासारखी ओढणी घेऊन डान्स केलाय आणि त्याची हूकस्टेप सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य सुद्धा या व्हिडिओमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.

गाण्याच्या प्रोमोशनसाठी वापरलेली ही वेगळी पद्धत सगळ्यांना खूप आवडतेय. अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या नवीन गाण्याचं कौतुक केलं. सोशल मीडियावर रश्मिका आणि अल्लू अर्जुनने गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याचं प्रोमोशन केलं.

पहिलं गाणंही गाजलं

काही दिवसांपूर्वी 'पुष्पा २' चं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. 'पुष्पा पुष्पा' हे त्या टायटल ट्रॅकचं गाणं सगळ्यांना आवडलं. 'पुष्पा २: द रुल' मध्ये आता अल्लू अर्जुनचा लूक कसा असेल याची छोटीशी झलकही या गाण्यात पाहायला मिळाली.

गोल्डन कलरचे हायलाईट्स, सिल्कचे प्रिंटेड शर्ट्स, पँट्स, गळ्यात हातात दागिने आणि क्लासिक शूज अशा वेगळ्या अंदाजात आता पुष्पा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय पुष्पाचं चिन्हही यावेळी गाण्यात दाखवण्यात आलं. हाताचा उलटा पंजा ही पुष्पाची निशाणी आणि त्याच्या गँगचा झेंडा याची झलक या गाण्यात पाहायला मिळाली.

मिका सिंग आणि नकाश अजीझ यांनी गाण्याचं हिंदी व्हर्जन गायलं असून रॉकस्टार डीएसपी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे

सगळ्यात जास्त चर्चा असलेला हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात रश्मिका, अल्लू अर्जुन यांच्या व्यतिरिक्त फहाद फाजिल याचीही मुख्य भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT