Pushpa 2 Teaser eSakal
Premier

Pushpa 2 Teaser : स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची ढांसू अ‍ॅक्शन.. बहुप्रतिक्षित 'पुष्पा-2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Allu Arjun Birthday : अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट भरपूर गाजला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा जगभरातील चाहते करत होते.

Sudesh

स्टायलिश स्टार म्हणून ओळख असणाऱ्या अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट भरपूर गाजला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा जगभरातील चाहते करत होते. या पुष्पा-2 चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनचा वेगळाच लुक आणि ढांसू अ‍ॅक्शन सीन्स पहायला मिळत आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज 42वा वाढदिवस आहे. या निमित्ताने 'पुष्पा 2 : दि रुल' या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा पुष्पा फ्लॉवर नाही तर 'फायर' आहे हे सिद्ध होतंय. (Allu Arjun Birthday)

टीझरमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) पहिल्या चित्रपटापेक्षा अगदी वेगळ्या रुपात दिसत आहे. आजपर्यंत कधीही दिसला नाही अशा अवतारात हा सुपरस्टार दिसत आहे. चक्क पूर्ण मेकअप आणि साडी घातलेल्या रुपात अल्लू अर्जुन दिसतोय. आठ सेकंदाच्या या टीझरमध्ये तो काही गुंडांची धुलाई करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लुक समोर आला होता. तसंच नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) लुकही एका पोस्टरच्या माध्यमातून शेअर केला होता. यामुळे आधीच या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू होती. त्यातच आता टीझर लाँच झाल्यामुळे फॅन्स अगदी खुश झाले आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT