Pushpa 2 esakal
Premier

Pushpa 2: प्रतीक्षा संपली! 'पुष्पा-2' चा टीझर 'या' दिवशी होणार रिलीज

Pushpa 2: पुष्पा-2 या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टर रिलीज करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Pushpa 2: 2024 हे वर्ष सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण यावर्षी विविध चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa The Rule) या चित्रपटाचा देखील समावेश आहे. अशातच आता पुष्पा द रुल या चित्रपटाचं एक पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. ज्यामध्ये अल्लू अर्जुन हा खास लूकमध्ये दिसला. अशातच आता पुष्पा-2 या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टर रिलीज करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

अल्लू अर्जुननं शेअर केला पोस्टर

अल्लू अर्जुननं शेअर केलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये घुंगरु घातलेले पाय दिसत आहे. या पोस्टरवर "टीझर ऑन 8.04.24", असं लिहिलेलं दिसत आहे. म्हणजेच येत्या 8 तारखेला पुष्पा-2 चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुननं शेअर केलेल्या पुष्पा-2 च्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अशातच अल्लू अर्जुननं पोस्टरसोबतच या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट देखील जाहीर केल्यानं चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

कधी रिलीज होणार पुष्पा-2?

पुष्पा 2 या चित्रपटाची प्रतीक्षा अल्लू अर्जुनचे चाहते करत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पुष्पा-2मधील अल्लू अर्जुनचा लूक

पुष्पा द रुल या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक काही महिन्यांपूर्वी रिव्हिल करण्यात आला होता. गळ्यात लिंबाची माळ, सोनेरी रंगाचे दागिने, हातात बंदुक अशा अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

'पुष्पा'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती

पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील गाणी, अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्स यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आता प्रेक्षक या चित्रपटाची सिक्वेलची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT