Pushpa 2 Dance Number SAKAL
Premier

Pushpa 2: 'पुष्पा-2'मध्ये समंथा नाही तर 'ही' अभिनेत्री करणार आयटम साँगवर डान्स? चर्चांना उधाण

Pushpa 2: The Rule: आता पुष्पा-2 या चित्रपटात समंथा नाही तर दुसरी प्रसिद्ध अभिनेत्री आयटम साँगवर डान्स करणार आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.

priyanka kulkarni

Pushpa 2 Dance Number: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अशातच आता पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली. या चित्रपटातील पुष्पा-पुष्पा हे पहिले गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर आता या चित्रपटातील अंगारो हे कपल साँग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुष्पा चित्रपटातील ऊ अंटवा या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्यावरील समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुष्पा-2 या चित्रपटात समंथा नाही तर दुसरी प्रसिद्ध अभिनेत्री आयटम साँगवर डान्स करणार आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.

'ही' अभिनेत्री करणार समंथाला रिप्लेस?

ऊ अंटवा या समंथा आणि अल्लू अर्जुनच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच आता पुष्पा-2 या चित्रपटामध्ये देखील एक आयटम साँग असणार आहे आणि यावेळी या आयटम साँगवर समंथा नाही तर अभिनेत्री तृप्ती डिमरी थिरकणार आहे, असं म्हटलं जात आहे. पुष्पा-2 या चित्रपटाच्या आयटम साँगमध्ये तृप्तीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण चित्रपटाच्या मेकर्सनं अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

तृप्तीला अॅनिमल या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रणबीर आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.

कधी रिलीज होणार पुष्पा-2?

पुष्पा-2 हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील  'अंगारों' (द कपल साँग) हे गाणं 29 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक पुष्पा-2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT