Raj Thackeray, Atharva Sudame  ESAKALq
Premier

VIDEO: महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे आणि अथर्व सुदामे यांचे रिल; दिला खास संदेश

अथर्वनं शेअर केलेल्या रिलमधून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खास संदेश दिला आहे.

priyanka kulkarni

Raj Thackeray And Atharva Sudame: आज (1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त (maharashtra din) अनेक जण सोशल मीडियावर विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करुन शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं (Atharva Sudame) महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास रिल शेअर केलं आहे. त्याच्या या रिलनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अथर्वनं शेअर केलेल्या रिलमधून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खास संदेश दिला आहे.

राज ठाकरे आणि अथर्वचं खास रिल

अथर्वनं शेअर केलेल्या रिलमध्ये दिसत आहे की, अथर्व हा महाराष्ट्र दिनानिमित्त खास भाषण करण्यासाठी तयारी करत आहे. मग तिथे राज ठाकरे येतात आणि अथर्वचं भाषण वाचतात. त्यानंतर ते अथर्वला खास संदेश देतात. सध्या अथर्व आणि राज ठाकरेंच्या या रिलची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

अथर्वनं राज ठाकरेंसोबतच्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, “महाराष्ट्र माझा, साहेबांन सोबत." अथर्व आणि राज ठाकरेंच्या या रिलवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

एका नेटकऱ्यानं राज ठाकरे आणि अथर्व यांच्या रिलला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "जय महाराष्ट्र" तर अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं कमेंट केली, आज आपण असं काय करणार आहोत, ज्यानं महाराष्ट्र पुढे जाईल?- हा योग्य प्रश्न आहे आणि विषयाची मांडणी देखील योग्य आहे.". अथर्वच्या रिलला आतापर्यंत 177k लाइक्स मिळाले असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ:

मनसेच्या रिल बाज पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेचं कौतुक केलं होतं. "हा माझा अत्यंत आवडता रिल स्टार आहे", असं म्हणत राज ठाकरेंनी अथर्वचं कौतुक केलं.

रिल बाज पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करुन अथर्वनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “A day i will never forget, The राज साहेब ठाकरे यांनी भाषण चालू असताना खास मला एकट्याला ओळखाव आणि रंगमंचावर बोलवून कौतुक करावं या पेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही राज ठाकरे साहेब"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चररला अटक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!

Aakhri Sawal Review: गांधीजींची हत्या ते बाबरी पतन; कसा आहे संजय दत्तचा 'आखरी सवाल'? वाचा रिव्ह्यू!

US Fuel System: अमेरिकेतील पेट्रोल पंपांवरील इंधन प्रणाली हॅक! ATG सिस्टम ठरले धोकादायक; तपास यंत्रणांचा कुणावर संशय?

IPL चालू असतानाच हार्दिक पांड्या माहिकाची करणार लग्न? चर्चेला उधाण, पण नेमकं सत्य काय?

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती! शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार

SCROLL FOR NEXT