tikali serial new entry  sakal
Premier

'राजा रानीची गं जोडी' फेम अभिनेत्याची 'तिकळी' मालिकेत दमदार एंट्री; साकारणार मुख्य भूमिका, नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

Tikali: लोकप्रिय अभिनेत्याची 'तिकळी' या मालिकेत एंट्री होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे.

Payal Naik

Tikali Serial Cast: विविध मराठीत वाहिन्यांवर विविध जॉनरच्या मालिका पाहायला मिळतात. इतक्या वाहिन्यांच्या गर्दीत आता प्रेक्षकांसाठी हवा तो जॉनर मालिका आणि कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या आवडी निवडीनुसार विविध कथा आणि जॉनर हाताळले जात आहेत. या सगळ्यात वाहिन्यांची मोठी स्पर्धा पाहायला मिळतेय. यातच सन मराठी वाहिनी एक भयावह कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. तिकळी असं या नव्या मालिकेचं नाव आहे. येत्या १ जुलै पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'तिकळी' या मालिकेत तिकळीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसणार असून, तिच्या जोडीला पूजा ठोंबरे देखील या मालिकेत रहस्यमय भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत आता खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कोणतीही मालिका ट्विस्टशिवाय अपूर्ण वाटते. तेव्हा एक मोठा ट्विस्ट घेऊन ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा या मालिकेत समोर येणार आहे. मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा या मालिकेत झळकणार आहे. अभिनेता पार्थ घाटगे या मालिकेत नव्या पात्राच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

पार्थने आत्तापर्यंत विविध मालिका, नाटकांमध्ये काम केलय. पार्थ हा या मालिकेत 'वेद' हे मुख्य पात्र साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या प्रोमोमध्ये वेदची खास एन्ट्री पाहायला मिळतेय. "प्रेमाला कुंपण काटेरी रुढींचे रुजेल का नाते नली आणि वेदचे?' असं खास कॅप्शन देत हा प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आलाय. तिकळीच्या आयुष्यातील तिला समजून घेणारा मुलगा वेद आहे पण वेद तिकळीला नवं आयुष्य देऊ शकेल का?

'वेद' तिकळीला लागलेला डाग कसा पुसणार? तिकळीला वेद तिच्या अस्तित्वासकट कसं स्वीकारणार आणि वेद तिकळी व ती तिसरी व्यक्ती म्हणजेच अभिनेत्री पूजा ठोंबरे साकारत असेललं पात्र यांचा एकमेकांशी काय संबंध असेल या सगळ्या रहस्यमय़ी प्रश्नांची उत्तरं या मालिकेतच मिळतील .या सगळ्यात वेद आणि तिकळी यांच्या प्रेमाची अनोखी कथा कशी बहरणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे. पार्थ यापूर्वी 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत दिसला होता. आता पुन्हा एकदा त्याला एका हटके भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT