Rajkummar Rao esakal
Premier

Rajkumar Rao: प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर अखेर राजकुमारनं सोडलं मौन; सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य

Rajkummar Rao: राजकुमारनं प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अशातच आता राजकुमारनं त्याच्या लूक्सबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Rajkummar Rao: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. विविध कार्यक्रमांना राजकुमार हजेरी लावतो. अशातच राजकुमारचा एका कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर राजकुमारनं प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अशातच आता राजकुमारनं त्याच्या लूक्सबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला राजकुमारचा फोटो

राजकुमारचा एका कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी दावा करू लागले की, राजकुमारची प्लास्टिक सर्जरी झाली आहे. राजकुमारवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स देखील बनवले. आता राजकुमारनं याविषयी माहिती दिली आहे. राजकुमारने त्याच्यावर बनवलेल्या मीम्सला 'फनी' असं म्हटलं आणि त्याच्या व्हायरल फोटो मागील सत्य सांगितलं आहे.

राजकुमारनं व्हायरल फोटोमागील सत्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबद्दल राजकुमार म्हणाला, "तुम्ही तो फोटो पाहिला असेल तर तो माझ्यासारखा दिसत नाही. हे खरं तर खूप मजेदार आहे कारण मला वाटते की कोणीतरी माझ्यासोबत प्रँक केला आहे. मला खात्री आहे की, तो फोटो एडिट केला गेला आहे."

"राजकुमार म्हणाल, मी सर्जरी केली नाही"

जेव्हा राजकुमारचा फोटो व्हायरल होऊ लागला तेव्हा लोकांनी त्याचे जुने फोटो शेअर करुन त्यानं प्लास्टिक सर्जरी केली आहे, असा दावा करण्यास सुरुवात केली. याबद्दल राजकुमार राव म्हणाला, 'लोक प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलत आहेत, मी सर्जरी केली नाही. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा लोक माझ्या लूकवर कमेंट करायचे. मी 8-9 वर्षांपूर्वी, फिलर्स केले होते. मी हे चांगले वाटण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी केलं,जेणेकरून माझा चेहरा चांगला दिसावा. हे माझ्या त्वचेच्या डॉक्टरांनी सुचवले होते. मला खरंच वाटतं की जर एखाद्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोष्टींची गरज असेल या गोष्टी त्यांनी कराव्यात, यामध्ये कोणतेही नुकसान नाही."

राजकुमार रावचा श्रीकांत हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT