Ramayana zoom
Premier

Ramayana: रणबीरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक; दशरथ राजाच्या भूमिकेत अरुण गोविल तर कैकेयीच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री

Ramayana: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'रामायण' या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन लीक होत आहेत.

priyanka kulkarni

Ramayana: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' (Ramayana) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून आता या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन लीक होत आहेत. या लीक झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमधील कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सेटवरील फोटो झाले लीक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'रामायण' या चित्रपटातील एका फोटोमध्ये अरुण गोविल हे दशरथ राजाच्या लूकमध्ये दिसत आहेत, तर या फोटोमध्ये लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसली. फोटोमध्ये लारा आणि शीबा चड्ढा या दोघी सेटवर जाताना दिसत आहे. शीबा चड्ढा ही 'रामायण' या चित्रपटात मंथरा ही भूमिका साकारणार आहे.

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील फोटोमध्ये अरुण गोविल हे काही बाल कलाकारांसोबत सीन शूट करताना दिसत आहे. या फोटोला 'झूम' हा वॉटर मार्क देण्यात आला आहे.

'रामायण' चित्रपटाची स्टार कास्ट

रणबीर 'रामायण' या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार आहे तर साई पल्लवी ही या चित्रपटात देवी सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असून अभिनेता यश रावणाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटा शूपर्णखाची भूमिका रकुल प्रीत सिंग साकारणार आणि विभीषणाची भूमिका विजय सेतुपती साकाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सेट तयार करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च

रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाच्या सेटसाठी निर्मात्यांनी 11 कोटी रुपये खर्च केले आहेत. रणबीरचा गेल्या वर्षी अॅनिमल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणबीरच्या रामायण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अॅनिमल या चित्रपटाप्रमाणेच रणबीरचा रामायण हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT