Ranbir kapoor esakal
Premier

Ranbir kapoor: "राहा तिच्या आजोबांसारखीच होणार " असं नीतू यांनी म्हणताच रणबीरचे डोळे पाणावले

द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) मध्ये ऋषी कपूर यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर (Neetu kapoor), त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी विविध आठवणी सांगितलं.

priyanka kulkarni

Ranbir kapoor: बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचं खानदान म्हणून कपूर परिवाराची ओळख आहे. या कुटूंबाच्या अनेक पिढ्यांनी सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कपूर कुटूंबातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणजे ऋषी कपूर. स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor ) आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. नुकतंच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये (The Great Indian Kapil Show) ऋषी कपूर यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर (Neetu kapoor), त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि मुलगी रिद्धिमा यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ऋषी यांच्या काही मजेशीर तर काही हृदयस्पर्शी आठवणी शेअर केल्या.

यावेळी रणबीरने सांगितलं कि, "रात्री जेवून झालं कि बाबा त्यांच्या बहिणीला फोन करायचे आणि तिची खिल्ली उडवायचे. मग माझी आत्या तिच्या आईला फोन करून बाबांची तक्रार करायची. मग आजी आईला फोन करून बाबांना ओरडायची. अशी धमाल घरात असायची." तो ही आठवण सांगत असतानाच नीतू यांनी माझ्या मुलांवर खरे संस्कार ऋषी यांनीच केले असा खुलासा केला. त्यांनी मुलांना लोकांशी कसं वागायचं, पैसा कसा सांभाळायचा हे सगळं शिकवलं. रणबीर आणि रिधिमा बाहेरगावी शिकत असताना ते मुलांना फक्त ते दोन वेळेला जेवू शकतील इतकेच पैसे द्यायचे. मुलांकडे इतके कमी पैसे असायचे कि जर त्यांनी हातरुमाल खरेदी करायचा ठरवलं तर त्यांना उपाशी राहायची वेळ येईल. मग अशावेळी मी मुलांना थोडे जास्तीचे पैसे द्यायचे अशी आठवण त्यांनी शेअर केली. त्या हे सांगत असतानाच "माझी खात्री आहे कि राहा मध्ये हे सगळे संस्कार येतील कारण रणबीरमध्ये ते संस्कार आहेत. " असंही म्हणाल्या. त्यांनी असं म्हणताच वडिलांच्या आठवणीने रणबीरचे डोळे पाणावले.

यासोबतच कपिलने त्याच्या युट्युब चॅनेलवर काही डिलीटेड सीन्स शेअर केले. यामध्ये कपिलने रणबीर आणि रिधिमाला त्यांची लहानपणीची वडिलांची सगळ्यात आवडती आठवण कुठली असा प्रश्न केला. त्यावर रणबीरने म्हंटल कि,"जेव्हा कधी आम्ही फिरायला जायचो बाबा आमच्यासोबत काय क्विझ गेम खेळायचे. आम्ही बाहेर डिनरला जायला निघालो कि ते कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसायचे आणि आम्ही तिघे मागे पॅसेंजर सीटवर असायचो. त्यावेळी बाबा आम्हाला कोडी घालायचे. ती कोडीसुद्धा मजेशीर असायची . जसं कि, 'मम्मीने बाहेरगावी किती शॉपिंग केली?', 'घोडेस्वारीला गेलेलो तेव्हा त्या घोड्याचं नाव काय होतं?' असे प्रश्न असायचे आणि तो खेळ खेळायला मज्जा यायची." अशी आठवण त्याने शेअर केली.

इतकंच नाही तर रणबीरने राहाला कपिलच्या शोमध्ये घेऊन यायची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कपिलच नाही तर सगळे प्रेक्षक खुश झाले आहेत. सोशल मीडियावर रणबीरची लेक अल्पावधीतच सेलिब्रिटी बनली आहे आणि तिला टीव्ही शोमध्ये पाहायला रणबीरचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT