marathi actress post on akshay shinde encounter  esakal
Premier

Akshay Shinde Encounter प्रकरणी लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, 'खऱ्या आयुष्यात...'

Marathi Actress Post On Akshay Shinde Encounter: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर आता एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट केली आहे.

Payal Naik

काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्या स्वच्छतागृहात स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणी बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत आपला राग व्यक्त केला होता. बदलापूर करांनी या घटनेचा निषेध म्हणून रेल्वे अडवून धरली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले होते. अनेक कलाकारही तेव्हा या प्रकरणी आपली मतं मांडताना दिसले. तेव्हा या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे.

अक्षय शिंदे हा सोमवारी पोलीसांबसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. ठाणे क्राइम ब्रांचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. आता या प्रकरणी 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीने एक पोस्ट केली आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं, 'शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणारा आरोपी महाराष्ट्र पोलिसांकडून मारला गेला आहे. यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.'

vidisha mhaskar

खऱ्या आयुष्यातील सिंबा

तिने पुढे लिहिलं, 'यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत’ आणि ही पोस्ट विदिशाने शेअर करत “खऱ्या आयुष्यातील सिंबा, सिंघम स्टोरी” असं म्हटलं आहे. तसंच या पोस्टद्वारे तिने आनंदही व्यक्त केला आहे. विदिशाच्या कामाबद्दल सांगायचं तर, ती ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यापूर्वी विदिशाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतही तिनं खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर ‘रंग माझा वेगळा’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ अशा मालिकेत काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT