bollywood actresses sakal
Premier

तिला खूप अ‍ॅटीट्युड... स्टायलिस्टसोबत वाईट वागायची राणी मुखर्जी; म्हणाली- ऐश्वर्यासोबतही काम केलं पण

Rani Mukherji : अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या स्टायलिस्टने तिच्यावर आता गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड कलाकार हे कायमच कॅमेरासमोर मेकअप करून येतात. छान तयार होऊन येतात. मात्र ते ज्यांच्यामुळे छान दिसतात ते मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट कायम दुर्लक्षितच राहतात. अशाच एका अनुभवी हेअर स्टायलिस्टने आता एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तिने अनेक अभिनेत्रींच्या वागणुकीबद्दल सांगितलं आहे. कुणी आपल्याला कशी वागणूक दिली याबद्दल तिने बिनधास्त भाष्य केलं आहे. हेअर स्टायलिस्ट मारिया यांनी नुकतीच बॉलिवूड नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राणी मुखर्जीने दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल भाष्य केलं.

मारिया म्हणाल्या, 'मी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत काम केलं आहे. ती खूप चांगली आहे. मी 'सिलसिला ये चाहत का' या गाण्यात तिचे केस सेट केले होते. पुढे एकदा जेव्हा मी कंगना रणौत सोबत ग्रीसला गेले होते. तिथे ऐश्वर्या आणि अभिषेक होते. ते पायऱ्या उतरत होते आणि मी चढत होते. मला वाटलं ती मला ओळखणार नाही पण तिने मला ओळखलं आणि स्वतःहून हाक मारली. मला विचारलं तू इथे कशी, मग मी सांगितलं की कंगनाची हेअर स्टायलिस्ट म्हणून आली आहे.'

कशी वागायची राणी?

पुढे मारिया म्हणाल्या, 'मी सुष्मिता सेनसोबतही काम केलंय. सुष्मिता मला नेहमी बोलवायची. तिला माझं काम पसंत होतं. पण माझा राणीबरोबरचा अनुभव खूप वाईट होता. माझं आणि तिचं एकदा खूप मोठं भांडण झालं होतं. ती नेहमी तिच्या केसांवरून गोंधळ घालायची आणि हेअर स्टायलिस्टला केस बदलायला सांगायची. ती मला हॉटेलवर बोलवायची आणि नंतर तिच्यासोबत घेऊन नाही जायची. शूटवर तिचे केस स्टाइल करायला सांगायची. मला नाही माहीत तिचा काय स्वभाव होता पण मी खूप मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. तरीही ती मला खूप वाईट वागणूक द्यायची.'

त्या पुढे म्हणाल्या, 'मी हेमा मालिनी, शर्मिला टागोर यांच्यासोबत काम केली. पण ती माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची, मला खूप वाईट वाटायचं. मी तिला शाप दिला. म्हणूनच की काय तिचे सगळे चित्रपट फ्लॉप झाले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT