Anant - Radhika Haldi Viral Video Esakal
Premier

Viral Video : अनंत अंबानींच्या हळदीला रणवीर-हार्दिकचा धुमाकूळ ; भन्नाट डान्स, ढोलवादन आणि बरंच काही, नेटकरी म्हणाले...

Anant Ambani Haldi Viral Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या हळदीला हार्दिक आणि रणवीर सिंहने केलेल्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होऊन दोन आठवडे उलटले तरीही त्यांच्या आलिशान विवाहसोहळ्याची चर्चा अजूनही सुरु आहे. या ग्रँड विवाहसोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी हजर राहिली होती. नुकताच या विवाहसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनंत राधिकाच्या हळदी समारंभाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मुंबईतील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा हळदी समारंभ थाटात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी हजर होती. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेता रणवीर सिंहने. या दोघांनी हळदीत केलेली धमाल चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंबानी आणि मर्चंट कुटूंब हळदीच्या रंगात रंगलेलं पाहायला मिळत आहे. तर हार्दिक आणि रणवीरने हळदीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. अनंत आणि राधिकाने सगळ्यांना हळद लावली होती तर अनंत भाऊ आकाश आणि आई नीताला हळदीमध्ये अक्षरशः भिजवून टाकलं. रणवीरने ढोलवादन केलं. तरहार्दिकबरोबर त्याने भन्नाट डान्स केला. एकत्र बँड वाजवतानाचा त्यांचा व्हिडिओही चर्चेत आहे.

सोशल मीडियावर अंबानींच्या या ग्रँड हळदी समारंभाचा व्हिडीओ चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत रणवीर आणि हार्दिकच्या बॉण्डचं कौतुक केलं. तर राधिका आणि अनंतची केमिस्ट्रीही अनेकांना आवडली.

१२ जुलै ते १५ जुलै या काळात अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. अनेक देश विदेशातील दिग्गज मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. लग्नानंतर जामनगरलाही खास समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT