Sikandar esakal
Premier

Sikandar: ठरलं! 'सिकंदर'मध्ये सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार 'ही' अभिनेत्री

Sikandar: सिकंदर या चित्रपटात कोणती अभिनेत्री काम करणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

priyanka kulkarni

Sikandar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'सिकंदर' (Sikandar) असं आहे. आता त्याच्या या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सिकंदर या चित्रपटात कोणती अभिनेत्री काम करणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

'ही' अभिनेत्री सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार

सिकंदर या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याबाबत Nadiadwala Grandson या प्रोडक्शन कंपनीच्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. आता सिकंदर चित्रपटात रश्मिका आणि सलमानची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

रश्मिकाचे चित्रपट

रश्मिका ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख निर्माण केल्यानंतर रश्मिकाने 2022 मध्ये गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने मिशन मजनू आणि ॲनिमल या बॉलिवूड चित्रपट भूमिका साकारल्या. सध्या रश्मिकाकडे अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 हा चित्रपट त्यापैकी एक आहे. तसेच ती विकी कौशलच्या छावा या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावर्षी ईदच्या दिवशी सलमानचा कोणताही चित्रपट रिलीज न झाल्यानं चाहते नाराज होते. पण त्याच दिवशी सलमानने सिकंदर चित्रपटाची घोषणा करुन चाहत्यांना खुश केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करणार आहेत. सलमाननं सिकंदर चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावरुन केली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं,"इस ईद 'बडे मियाँ छोटे मियाँ' और 'मैदान' को देखो और आगली ईद सिकंदर से आ कर मिलो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT