Ratan Tata, Simi Garewal  esakal
Premier

Ratan Tata: रतन टाटा 'या' अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात; आजही आहेत चांगले मित्र

Ratan Tata: रतन टाटा हे अविवाहित राहिले असले तरीही ते तरुणपणात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते.

priyanka kulkarni

Ratan Tata: भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बुद्धिमान व्यावसायिक, मदतीसाठी कायमच हात पुढे करणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख आहे. पण रतन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच चर्चा झाल्या आहेत. रतन टाटा हे अविवाहित राहिले असले तरीही ते तरुणपणात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. यात एका गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. या अभिनेत्री होत्या सिमी गरेवाल.

सिमी आणि रतन काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. याबाबत त्यांनी सिमी गरेवाल यांचा गाजलेला शो Rendezvous with Simi Garewal मध्ये याविषयी उल्लेख केला होता. रतन टाटा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी सांगताना सिमी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या,”आम्ही फार पूर्वी रिलेशनशिपमध्ये होतो. तंटे खूप परफेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे खूप उत्तम विनोदबुद्धी आहे. पैसा हा कधीच त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा नाहीये आणि परदेशात जितके आरामात असतात तितके ते भारतात नसतात.”

काही कारणामुळे त्यांचं रतन टाटांसोबतचं रिलेशन तुटलं पण तरीही त्यांची मैत्री कायम राहिली. सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये सुद्धा रतन टाटा यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चा केली होती.

रतन हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते पण चारही वेळा त्यांचं लग्न ठरता ठरता मोडलं. याचा उल्लेख त्यांनी सिमी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. या अनुभवांमुळे पुढे रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही.

कर्ज, मेरा नाम जोकर यांसारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलेल्या सिमी यांचे रिलेशनशिपसुद्धा खूप गाजले. मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबतही सिमी काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या पण नंतर त्यांचं नातं तुटलं. मन्सूर यांनी पुढे जाऊन अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं. तर सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केलं जे दिल्लीच्या चुन्नामल परिवाराशी संबंधित होते. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT