Aparna Thakur ravi kishan esakal
Premier

Aparna Thakur : 'मला आणि माझ्या मुलीला जाहीरपणे स्वीकारावं', रवी किशन यांची पत्नी असल्याच्या महिलेच्या दाव्याने उडाली खळबळ

Ravi Kishan: देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या या घोडदौडीत अनेक कलाकारही सामील झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या या घोडदौडीत अनेक कलाकारही सामील झाले आहेत. अभिनेते रवी किशन यंदाही निवडणूक भाजपतर्फे लढवत आहेत पण निवडणुकीपूर्वीच गोरखपूरचे खासदार असलेले रवी किशन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत ती रवी किशन यांची पत्नी आहे असा दावा केला आहे. या दाव्यामुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

(Who is Aparna Thakur)

अपर्णा ठाकूर हिने दावा केला आहे कि, १९९६ मध्ये त्यांचं रवी किशन यांच्यासोबत मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न झालं होतं त्यावेळी फोन उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटोज नसले तरीही ते जेव्हा बाहेर फिरायला गेले होते किंवा त्यांचे इतर कार्यक्रमातील फोटोज उपलब्ध आहेत. अपर्णा यांना एक मुलगी असून ही मुलगी रवी किशन यांची असल्याचा दावा त्यांनी केलाय. “माझ्या मुलीला तिचे हक्क मिळावेत म्हणून मी आज ही गोष्ट उघड करतेय.” असं या महिलेने या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांपासून ते त्यांच्या संपर्कात नाहीयेत. त्या आधी जरी त्यांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं असलं तरीही समाजासमोर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला पत्नी आणि मुलीचा सन्मान दिला नाहीये. त्यांची कोणत्याही प्रकारे मदत केली नाहीये. त्यांनी आता कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाहीये. त्यामुळे मुलीला तिचे हक्क मिळावेत म्हणून त्या कोर्टात जाणार असल्याचा दावा त्यांनी केलाय तसेच त्यांच्या कथित मुलीने DNA टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

या मुलीचं नाव शिनोव्हा असं असून तिने पत्रकार परिषदेत असून तिनेही तिची बाजू मांडली. “मी १५ वर्षांची होईपर्यंत मला ते माझे वडील आहे हे माहित नव्हतं. मी त्यांना काका अशी हाक मारायचे. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ते घरी यायचे. त्यांच्या कुटूंबाला मी भेटले आहे. वडील म्हणून ते माझ्यासाठी कधीच ते उपलब्ध नव्हते. फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी त्यांनी माझी मदत करावी अशी माझी इच्छा नाहीये पण त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारावं असं मला वाटतं. आईने त्यांना खूपदा याविषयी सांगितलं पण ते स्वीकारत नाहीयेत. चार वर्षांपासून आमची त्यांच्याशी भेट झाली नाहीये त्यामुळे आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत.”

रवी किशन यांचे संपूर्ण कुटूंब अपर्णा आणि त्यांच्या मुलीला ओळखत असल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणावर रवी किशन आणि त्यांच्या कुटूंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण या दाव्यांमुळे रवी किशन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT