suraj chavhan esakal
Premier

आई-वडिलांचं निधन, बहिणीने केला सांभाळ, ३०० रुपयांसाठी मजुरी करायचा सूरज चव्हाण, गुलीगत धोकाने असं बदललं स्वतःचं नशीब

Suraj Chavan in Bigg Boss Marathi season 5: 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात आलेल्या एका रीलस्टारची सोशल मीडियावर चर्चा आहे तो म्हणजे सुरज चव्हाण

Payal Naik

Reel Star Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार पाहायला मिळतायत. अभिनेत्री वर्षा उसगावकरपासून ते छोटा पुढारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळतायत. यावेळेस घरात अनेक रील स्टार्सची चलती आहे. या रील स्टार्समधील एक नाव आहे सुरज चव्हाण. गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचला आहे. मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण, तो इथपर्यंत कसा पोहोचला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

वाचा सुरजबद्दल बरंच काही

सुरज हा बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे. सुरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला. मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आई- वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं. त्याचा स्वभाव फार भोळा आणि मृदू आहे. लहानपणापासून त्याने गरिबीत हलाखीचे दिवस पाहिले. त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. त्याचं शिक्षण हे ८ वी पर्यंतच झालं आहे. त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली. तो दररोज मजुरीसाठी जायचा. मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉकबद्दल सांगितलं.

त्यानंतर सुरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो व्हायरल झाला. त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला. त्यानंतर स्वतःची आयडी बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला. तो टिक टॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले. मदतदेखील करू लागले. मात्र कालांतराने टिक टॉक भारतात बॅन झालं. मात्र त्यानंतर त्याला युट्युबवरील सीरिज 'प्रेमासाठी काहीपण' विचारणा झाली. त्यानंतर त्याने 'बुक्कीत टेंगुळ' हे व्हिडिओ केले. त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारणा झाली. त्याचे आज युट्यूबवर लाखो फॉलोवर्स आहेत.

सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली. आता तो बिग बॉस मराठी मध्ये दिसतो आहे. सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र सुरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT