Renuka Swamy Murder Case Kannada actor Darshan esakal
Premier

Renuka Swamy Murder Case : रेणुकास्वामी खून प्रकरणातील 'या' आरोपी अभिनेत्याच्या जवळचा सहकलाकार, सहकाऱ्यास अटक

मोटारीमध्ये महिलेची बॅग सापडली आहे. ही बॅग पवित्रा गौडा हिची असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पवित्रा यांना अश्लील मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली चित्रदुर्ग येथून ८ जून रोजी रात्री रेणुकास्वामी याचा खून करण्यात आला होता.

बंगळूर : रेणुकास्वामी खून प्रकरणातील (Renuka Swamy Murder Case) आरोपी कन्नड अभिनेता दर्शनचा (Kannada actor Darshan) जवळचा सहकारी नागराज आणि सहकलाकार प्रदोष यांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस सूत्रांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, नागराज दर्शनाचा सर्व व्यवहार पाहत होता. म्हैसूर येथील दर्शनच्या फार्महाऊसचीही तो काळजी घेत होता. पोलिसांनी दर्शन, त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री पवित्रा गौडा आणि इतर ११ जणांना अटक केल्यापासून नागराज फरार होता.

या खुनातील प्रदोषच्या भूमिकेबाबत पोलिस सूत्रांनी माहिती दिली नाही. प्रदोषने काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये काम केले आहे. ज्यात दर्शनची भूमिका होती. खुनात एकूण १७ जण सहभागी असल्याची माहिती आहे. अनुसह जगदीश ऊर्फ ​​जग्गा, रवी आणि राजू हे फरार आहेत. याशिवाय खुनात वापरलेली जीप, मोटार जप्त केली आहे. लाल रंगाच्या जीपमध्ये दारूची बाटली सापडली आहे.

मोटारीमध्ये महिलेची बॅग सापडली आहे. ही बॅग पवित्रा गौडा हिची असल्याचे सांगण्यात येत आहे. पवित्रा यांना अश्लील मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली चित्रदुर्ग येथून ८ जून रोजी रात्री रेणुकास्वामी याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कामाक्षीपाळ्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाल्यात फेकून देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT