Rhea Post For Radhika Esakal
Premier

Anant Ambani & Radhika Merchant Wedding : "आमच्या जिवलग मैत्रिणीचं लग्न होतंय..." ; राधिकासाठी सोनमच्या बहिणीची खास पोस्ट

Rhea Kapoor special post for Radhika Merchant : अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आणि फॅशन डिझायनर रिहा कपूरने राधिका मर्चंटसाठी खास पोस्ट शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Rhea Kapoor : आज सगळीकडे चर्चा आहे ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आलिशान विवाहसोहळ्याची. आज रात्री पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी गेले वर्षभर सुरु होती आणि लग्नापूर्वीचे सगळे कार्यक्रम विशेष गाजले. या सगळ्या कार्यक्रमात नववधू राधिकाचे लूक चर्चेत राहिले. प्रत्येक कार्यक्रमातील तिच्या आऊटफिटची खास चर्चा झाली. हे सगळे लूक डिझाईन केले होते अभिनेत्री सोनम कपूरची बहीण आणि स्टायलिस्ट रिहा कपूरने. सोशल मीडियावर रिहाने राधिकाला खास पोस्ट शेअर केली.

रिहाची पोस्ट

राधिकाचे आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमातील विविध लूकचे फोटो पोस्ट करत रिहाने खास पोस्ट राधिकासाठी लिहिली आणि तिच्या संपूर्ण टीमचं तिने यावेळी कौतुकही केलं. "आमच्या मुलीचं आज रात्री लग्न होणार आहे." असं कॅप्शन रिहाने या पोस्टला दिलं आणि तिच्याबरोबर या लग्नासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच तिने या पोस्टच्या माध्यमातून आभार मानले.

शिरीना, सनाया कपूर, मेघना, सुजाता, लव्हलीन, हिरल भाटिया, डॉली जैन या स्टायलिंग क्षेत्रातील नामवंतांनी राधिकाच्या लग्नासाठी विशेष मेहनत घेतली आहे. शिरीना आणि सनाया यांनी राधिकाच्या प्रत्येक लूकच स्टायलिंग केलं होतं तर राधिकाच्या साड्या डॉली जैन यांनी तिला नेसवल्या होत्या. तर लव्हलीन आणि हिरल भाटिया यांनी राधिकाचा मेकअप केला होता. तर मेघना आणि सुजाता यांनीही या राधिकाच्या लग्नातील प्रत्येक लूककडे लक्ष दिलं होत.

ग्रहशांती पूजेवेळी राधिकाने नेसलेली सोनेरी काठ असलेली पांढरी साडी असो किंवा शिवशक्ती पूजेवेळी नेसलेला जांभळ्या रंगाचा पटोला पद्धतीचा लेहेंगा, मौसालु या कार्यक्रमावेळी तिने घातलेला रंगीबेरंगी लेहेंगा किंवा हळदीवेळी मोगऱ्याचा विणलेला दुपट्टा आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा या सगळ्या लूकचं विशेष कौतुक होतंय. तिचे हे सगळे लूक खूप गाजले.

आज १२ जुलैला रात्री ८ वाजता राधिका आणि अनंतचं लग्न मुंबईतील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नाला देशविदेशातील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT