Rinku Rajguru social media
Premier

VIDEO: रिंकूनं 'या' अभिनेत्यासोबत साजरा केला वाढदिवस; बर्थ-डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

Rinku Rajguru: रिंकूनं नुकताच तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Rinku Rajguru: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रिंकूनं सैराट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर काही मराठी सिनेमांमध्ये तिनं काम केलं. रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे. काल (3 जून) रिंकूच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत होते. रिंकूनं नुकताच तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रिंकूनं 'या' अभिनेत्यासोबत साजरा केला वाढदिवस

रिंकूनं अभिनेता शिव ठाकरेसोबत बर्थ-डे सेलिब्रेट केला आहे. रिंकूनं तिच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये ती केक खाताना दिसत आहे तसेच ती व्हिडीओमध्ये मरिन ड्राइव्ह येथे बसलेली दिसत आहे.

रिंकूच्या व्हिडीओमध्ये शिव दिसत नाही पण रिंकूनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शिवच्या नावाचा उल्लेख केला आहे. रिंकूनं व्हिडीओला कॅप्शन दिलं,"हा माझ्या बर्थ-डे केकचा सर्वात गोड तुकडा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. माझा दिवस इतका खास बनवल्याबद्दल शिव ठाकरेचे देखील आभार"

पाहा व्हिडीओ:

मेकअप, झुंड हे रिंकूचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच काही महिन्यांपूर्वी रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट देखील रिलीज झाला होता.या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं साकारलेल्या आर्ची या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन

Pune Weather Update: पुण्यात पुन्हा सरींचा हल्ला! पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा

Solapur Municipal Corporation: बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करा; आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जनता दरबारात दाद

SCROLL FOR NEXT