Riddhima Kapoor
Riddhima Kapoor sakal
Premier

Riddhima Kapoor : 'त्यांचा तो मिसकॉल मी अजून जपून ठेवलाय'; ऋषी कपूर यांची अखेरची आठवण सांगताना लेक झाली भावुक

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडमधील एक दमदार अभिनेते ऋषी कपूर यांचं २०२० मध्ये निधन झालं. त्यांना ल्युकेमियाचं निदान झालं होतं आणि अमेरिकेत यावरील उपचार पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा भारतात आले होते. पण भारतात आल्यावर त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांची तब्येत खालावली. त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि संपूर्ण सिनेविश्वाला धक्का बसला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी यांची मुलगी रिधिमाने त्यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल वक्तव्य केलं.

रिधिमाने नुकतीच गॅलाटा इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांबद्दल आणि त्यांच्या निधनाने कपूर कुटूंबियांवर झालेल्या परिणामाबाबत खुलासा केला. ऋषी यांचा स्वभाव खूपच हसमुख होता त्यामुळे त्यांच्या आजाराविषयीचं गांभीर्य कुणाच्याच लक्षात आलं नाही.

'शर्माजी नमकीन' या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाही त्यांच्यावर डॉक्टर देखरेख ठेवून होते असा खुलासाही रिधिमाने यावेळी केला. त्यांनी आराम करावा अशी कुटूंबाची इच्छा असतानाही ऋषी दिल्ली फिरत होते आणि त्यांनी तेथील रस्त्यावर मिळणारे प्रसिद्ध पदार्थही खाल्ले असं ती म्हणाली.

वडिलांच्या अखेरच्या दिवसांबद्दल बोलताना ती म्हणते, 'जेव्हा बाबा अखेरच्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मी दिल्लीत होते आणि लॉकडाऊनमुळे मी येऊ शकत नव्हते. त्यांच्या अखेरच्या क्षणीही मी येऊ शकले नाही. लॉकडाऊन असल्यामुळे मला मोठ्या मुश्किलीने रस्त्यावरून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आणि मी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मुंबईत आमच्या घरी पोहोचले. त्यांच्या निधनाची बातमी मला व्हिडीओ कॉलद्वारे कळवली होती.'

यावेळी तिने ऋषी कपूर यांचे निधन होण्याच्या दोन दिवसा पूर्वीची एक भावनिक आठवणही शेअर केली. ती म्हणाली, 'ते जाण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी मला शेवटचा कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. तो मिस कॉल मी अजूनही जपून ठेवला आहे. तो त्यांचा अखेरचा त्यांनी मला केलेला कॉल होता आणि मला अजूनही असं वाटतं कि तो फोन मी उचलायला हवा होता.

त्यानंतर त्यांच्याशी माझं बोलणं होऊ शकलं नाही कारण ते हॉस्पिटलमध्ये होते. मी त्या मिसकॉलचा स्क्रिनशॉट काढून अजूनही माझ्या फोनमध्ये जपून ठेवला आहे. तो अखेरचा कॉल होता जेव्हा त्यांना खरंच माझ्याशी बोलायचं होतं आणि तो फोन मी उचलू शकले नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला होता पण ते तेव्हा बोलू शकत नव्हते.'

३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं. लॉकडाऊन असल्यामुळे त्यांची मुलगी अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकली नव्हती पण तिने तिच्या वडिलांचं व्हिडीओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतलं. आजही चाहते ऋषी यांना खूप मिस करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT